Saam Tv
औषधांऐवजी सोपे घरगुती उपाय करून तुम्ही घरच्या घरीच खोकल्यापासून सुटका मिळवू शकता.
एक चमचा मधात कोमट पाणी मिसळून प्यायल्याने घशातील खवखव कमी होते आणि खोकला थांबण्यास मदत होते.
कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून गुळण्या केल्यास घशातील जळजळ आणि संसर्ग दूर होतो.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यायल्याने घशाला आराम मिळून कोरड्या खोकल्यामध्ये त्वरित आराम पडतो.
तुळशीची पाने पाण्यात उकळून तयार केलेला हा चहा प्यायल्याने घशाची खवखव कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरड्या खोकल्यामध्ये आराम मिळतो.
उकळत्या पाण्यात नीलगिरीतेलाचे थेंब टाकून वाफ घेतल्याने बंद नाक मोकळे होते आणि घशातील कोरडेपणा कमी होतो.
हवामान बदलताना धूलिकण आणि थंड हवेपासून बचाव करण्यासाठी बाहेर जाताना मास्क वापरावा आणि थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
कोरडा खोकला सलग दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास.
खोकल्यासोबतच श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, छातीत कळा येत असल्यास किंवा छाती जड पडत असल्यास.
खोकल्यासोबत तोंडातून रक्त किंवा कफमध्ये रक्त पडल्यास तसेच तीव्र ताप असल्यास.
NEXT : तुमचे चांदीचे दागिने काळे पडत आहेत का? दिवाळीपूर्वी ते घरीच स्वच्छ करा नव्यासारखे