Weight Loss Recipes:
सध्याच्या धकाधकीच्या जिवनात प्रत्येक व्यक्ती बाहेरचं फास्ट फूड खातात. फास्ट फूड जास्त खाल्ल्याने त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. विविध समस्यांसह वजन वाढणे ही तर एक कॉमन समस्या झाली आहे. अनेक व्यक्ती वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी मोठी कसरत करतात. तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आहारावर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
आहारावर नियंत्रण ठेवताना म्हणजे डाएट करताना अनेक व्यक्तींना फार भूक लागते. त्यांना भूक सहन होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एक सिंपल आणि प्रोटीन युक्त रेसिपी पाहणार आहोत.ही रेसिपी घरच्याघरी बनवणे फार सोप्प आहे.
वजन कमी करण्यासाठी स्प्राउट्स (कडधान्य) सॅलड खावेत. यात उच्च प्रथिने, उच्च फायबर, शून्य प्रमाणात तेल असते. या रेसिपीमध्ये तुम्हाला 352 कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रथिने मिळतील. लंच किंवा डिनरसाठी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.
साहित्य
डाळी मिसळा - 60 ग्रॅम
काजू - 15 ग्रॅम
दही-100 ग्रॅम
कांदा - 20 ग्रॅम
टोमॅटो - 40 ग्रॅम
काकडी-70 ग्रॅम
पुदिन्याची पाने - गार्निशसाठी
कोथिंबीर- सजवण्यासाठी
हिरवी मिरची-चवीनुसार
काळी मिरी पावडर - 1/4 टीस्पून
ऑरेगॅनो मसाला - आवडीनुसार
मीठ - चवीनुसार
कृती
सर्वात आधी डाळी आणि शेंगदाणे धुवून घ्या. त्यानंतर ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या डाळी आणि शेंगदाणे जळीत घेऊन त्यातील पाणी गाळून घ्या. त्यानंतर २४ तास छिद्र असलेल्याजाळीत हे झाकून ठेवा. रेसिपी बनवताना पाण्याच्या वाफेवर कडधान्य आणि शेंगदाणे वाफवून घ्या. यात चिरलेल्या भाज्या, दही, मीठ, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो घालून मिक्स करा. हाय प्रोटीन हाय फायबर स्प्राउट्स सॅलड सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही ऑफिसमध्ये टिफीनसाठी देखील हे सॅलड खाऊ शकता. हे सॅलट खाल्ल्यामे तुम्हाला सतत भूक लागणार नाही. सकाळी दर ९ वाजता तुम्ही ही डिश खाल्ली तर दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.