Broccoli, Weight loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Recipe : वेट लॉस करताय? ब्रोकोलीपासून बनवा डिलिशियस स्नॅक्स

वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ट्राय करा

कोमल दामुद्रे

Weight Loss Recipe : आजच्या काळात लोकांना वजन कमी करायचे असते, पण त्यांना ते शक्य होत नाही कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डाएटिंग करणे शक्य होत नाही.

वजन कमी करण्यासाठी आपण खाण्यापिण्यात अधिक कंट्रोल करतो. परंतु, यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

वजन कमी (Weight loss) करताना आपल्याला खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या मन मारुन खाण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे आपले वजनही कमी होईल व आरोग्य देखील निरोगी राहिल. (Weight Loss Recipe In Marathi)

वजन कमी करताना आपण खूप चवदार पदार्थ खाऊ शकता. आपल्या फक्त निरोगी आणि कमी-कॅलरी शरीरात तयार करायच्या आहे. इतकेच नाही तर आपण आपल्या आहारात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश करू शकतो.

अशीच एक भाजी म्हणजे ब्रोकोली. ब्रोकोलीच्या मदतीने आपण असे काही स्नॅक्स बनवू शकता, जे हेल्दी आणि चविष्ट असतात. ब्रोकोलीच्या मदतीने बनवलेले स्नॅक्स आज आपण बनवूया.

ब्रोकोली सॅलड खायला चविष्ट तर आहेच, पण तितकीच स्वादिष्टही आहे. ते बनवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याचीही गरज नाही.

साहित्य-

ब्रोकोली - ३ कप

कांदा - १ चिरलेला

लसूण - २ ते ३ पाकळ्या

चवीनुसार मीठ

चिली फ्लेक्स

व्हिनेगर किंवा लिंबाचा रस - १ चमचा

ऑलिव्ह तेल - ३ चमचे

Broccoli Salad

कृती -

१. एका सॉसपॅनमध्ये थोडे पाणी घ्या, चिमूटभर मीठ घाला आणि उकळी आणा.

२. आता त्यात ब्रोकोली घालून झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे शिजवा. व ते गाळून बाजूला ठेवा.

३. आता एका भांड्यात कांदा, लसूण, मीठ, चिली फ्लेक्स, तेल (Oil) आणि व्हिनेगर घ्या. चांगले मिसळा.

४. शिजवलेली ब्रोकोली घाला आणि चांगले मिसळा. सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT