Cancer symptoms SAAM TV
लाईफस्टाईल

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Oral cancer symptoms : फक्त वीकेंडला सिगारेट, गुटखा किंवा दारू घेत असाल तर सावध व्हा. तंबाखू आणि मद्यपानामुळे तोंड व घशाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तोंडातील पांढरे किंवा लाल डाग, गाठ आणि गिळताना त्रास यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नका.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न असो, पार्टी असो किंवा वीकेंडची सुट्टी... या निमित्ताने मित्र-परिवारासोबत वेळ घालवून आनंद साजरा केला जातो. मात्र अनेकदा या सेलिब्रेशनमध्ये ‘एन्जॉयमेंट’च्या नावाखाली दारू, सिगारेट किंवा गुटख्याचे सेवन केलं जातं. मोठ्या शहरांमध्ये धावपळीचे जीवन, कामाचा ताण आणि एकटेपणा दूर करण्यासाठी काही जण मद्यपान करतात. त्या क्षणी मनाला बरं वाटतं, पण अशा सवयींचा परिणाम हळूहळू शरीरावर होऊ लागतो.

सुरुवातीला या सवयींमुळे होणाऱ्या धोक्याची जाणीव होत नाही. ‘मी रोज घेत नाही’, ‘फक्त पार्टीमध्येच घेतो’ किंवा ‘वीकेंडलाच सिगारेट ओढतो’ असं म्हणत अनेक जण ही सवय फार गंभीरपणे घेत नाहीत. मात्र अधूनमधून सुरू झालेली सवय पुढे वारंवार होऊ शकते आणि आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकते.

तंबाखू हे तोंडाच्या कॅन्सरचं मोठं कारण

दिल्लीच्या अपोलो रूग्णालयातील सीनियर कन्सल्टंट आणि हेड अँड नेक ऑन्कोलॉजी डॉ. अक्षत मलिक यांच्या मते, तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमुख कारणांमध्ये तंबाखूचं सेवन हे महत्त्वाचं कारण आहे. गुटखा, खैनी, जर्दा आणि तंबाखू असलेले पान यांसारख्या तंबाखूच्या पदार्थांमुळे तोंडाच्या आतील त्वचेला आणि हिरड्यांना नुकसान होतं. दुसरीकडे, सिगारेट आणि बिडीच्या धुरामुळेही तोंड, डोके आणि मानेच्या भागातील कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

‘फक्त वीकेंडला घेतो’ म्हणून धोका कमी होत नाही

काही लोकांना वाटतं की आपण तंबाखू रोज घेत नाही त्यामुळे त्याचा धोका कमी असेल. पण तंबाखू कोणत्याही स्वरूपात घेणं आरोग्यासाठी सुरक्षित मानलं जात नाही. सुरुवातीला फक्त कधीतरी घेतलेली सिगारेट, गुटखा किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांची सवय हळूहळू वाढत जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या सवयींकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.

दारू आणि तंबाखू एकत्र घेणं अधिक धोकादायक

दारू आणि तंबाखू या दोन्हींचं एकत्र सेवन अधिक धोकादायक मानलं जातं. दारूमुळे तोंडाच्या आतील भागावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर तंबाखूमध्ये असलेल्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणाऱ्या रसायनांचा शरीराशी संपर्क वाढू शकतो. त्यामुळे दारू आणि तंबाखू एकत्र घेणाऱ्यांमध्ये तोंड आणि घशाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

तरुणांमध्ये ‘सोशल स्मोकिंग’ म्हणजे मित्रांसोबत भेटल्यावर किंवा पार्टीमध्ये कधीतरी सिगारेट ओढण्याची सवयही अनेकदा फार गंभीर मानली जात नाही. ‘मी रोज सिगारेट ओढत नाही’ असं सांगून ही सवय सहज दुर्लक्षित केली जाते. पण कोणतीही सवय अनेकदा अशाच छोट्या सुरुवातीपासून तयार होते.

शरीराने दिलेले हे संकेत दुर्लक्षित करू नका

  • खालीलपैकी कोणताही त्रास जाणवत असल्यास त्याकडे विशेष लक्ष द्या-

  • तोंडाच्या आत पांढरा किंवा लालसर डाग दिसणं

  • तोंड पूर्णपणे उघडताना किंवा चावताना त्रास होणं

  • जेवताना किंवा काही खाताना सतत जळजळ किंवा वेदना होणं

  • जीभेवर किंवा तोंडाच्या कोणत्याही भागात गाठ किंवा जाडसरपणा जाणवणं

  • अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणं

  • मानेमध्ये वेदना नसलेली गाठ जाणवणं

  • आवाजात बराच काळ बदल राहणं

यापैकी कोणताही त्रास जाणवत असल्यास स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी हेड अँड नेक किंवा ओरल कॅन्सरच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सेलिब्रेशन करा पण आरोग्याचीही काळजी घ्या

वीकेंड एन्जॉय करण्यासाठी दारू, सिगारेट किंवा गुटखा घेणं हाच एकमेव पर्याय नाही. त्याऐवजी व्यायाम, सायकलिंग, पोहणं किंवा आपल्या आवडीची एखादी अॅक्टिव्हिटी करता येते. अशा गोष्टींमुळे शरीरालाही त्याचा फायदा होतो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या साठ्यात ४० टक्क्यांची घट

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

Traditional Vati Mangalsutra: मराठमोळ्या लूकवर उठून दिसेल पारंपरिक वाटी मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT