Gaur Gopal Das On Success  Saam tv
लाईफस्टाईल

Gaur Gopal Das On Success : आयुष्यात घवघवीत यश हवंय? गौर गोपाल दासांचा यशाचा हा फॉर्मूला लक्षात ठेवाच!

Positive Thoughts : यशाची पायरी चढताना आपल्याला बरेचदा अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा आपल्यात नकारात्मक ऊर्जा देखील संचारते.

कोमल दामुद्रे

Success Tips By Gaur Gopal Das :

यश मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो परंतु, नेहमीच मिळते ते अपयश. यशाची पायरी चढताना आपल्याला बरेचदा अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बरेचदा आपल्यात नकारात्मक ऊर्जा देखील संचारते.

गौर गोपाल दास म्हणतात की, यशस्वी होण्यासाठी अनेकदा आपण नव्या योजना आखतो तसेच कठीण परिश्रम घेतो. परंतु, इतके सगळं करुनही वाट्याला येते ते अपयश. गोपाल दास यांनी यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या मते काही वाईट सवयी सोडल्यास आयुष्यात हमखास यश मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सवयी सोडा

1. लोक काय म्हणतील किंवा विचार करतील याविषयी काळजी करणे थांबवा. यामुळे आपल्या अपयशात (failure) अडचणी येतील. लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याविषयी विचार करु नका. यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा.

2. नकारात्मकेतपासून (Negativity) दूर राहा. तुम्ही आयुष्यात कितीही वेळा अयशस्वी झाला तरी प्रयत्न करणे थांबवू नका. सतत प्रयत्न करत राहिल्याने यश नक्कीच मिळेल.

3. योग्य वेळीच (Time) वाट पाहण्यात आयुष्यातील वर्षे वाया घालवू नका. वेळ कधीच चांगली किंवा वाईट नसते. तो आपल्या मनाचा फक्त भ्रम असतो. ज्या क्षणापासून तुम्ही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न कराल. यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल.

4. आव्हानांचा स्वीकार करा त्यातून कधीही पळ काढू नका. त्याऐवजी धैर्याने लढा. त्या समस्येतून मार्ग कसा काढता येईल. यावर लक्ष द्या. अनेक आव्हानाला सामोरे जा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल.

5. जबाबदाऱ्यांपासून लांब जाऊ नका. असे केल्याने तुम्ही मागे पडाल. तुम्ही प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्यास त्यात नक्कीच यश मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT