Budhwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Budhwar che Upay: अडकलेली काम पूर्ण होणार, घरात पैसाही येणार; बुधवारच्या दिवशी हे उपाय करून मिळवा गणपतीचा आशिर्वाद

Wednesday Remedies in marathi: हिंदू धर्मात बुधवार हा दिवस गणेशजींना समर्पित आहे. असं मानलं जातं की, या दिवशी भगवान गणेशाची विशेष पूजा केल्याने बिघडलेली कामं पूर्ण होतात. शिवाय भगवान गणेशाचे आशीर्वाद कायम राहतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण एका देवाला समर्पित केलेला असतो. आज बुधवार असून बुधवारचा दिवस हा गणपतीचा समर्पित केलेला आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त मनोभावे त्याची पूजा करतात. जे भक्त गणपतीची मनोभावे पुजा करतात त्यांना गणपती योग्य ते फळ देखील देतो. गणपती बाप्पाची पुजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येतात. याशिवाय कुंडली मधील बुध देखील मजबूत होण्यास मदत होते.

बुधवारच्या दिवशी ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे काही उपाय आहेत ते भक्तांनी केले पाहिजेत. हे उपाय केल्याने तुमचं नशीब उजळू शकतं शिवाय तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात.

बुधवारी कोणते उपाय केले पाहिजे?

गणपतीच्या मंत्राचा जाप

गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारच्या दिवशी पुजा केली पाहिजे. यावेळी 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा' या जप दरम्यान भगवान गणेशाला शमीची पाने आणि सुपारीची पानं अर्पण करावीत. कुरुमध्ये देव नेहमीच कोणत्याही अडथळ्यांशिवाय काम करत असतो. मानसिक किंवा दृश्यमानपणे मंत्राचा जप करत रहा.

वास्तू दोष दूर कऱण्यासाठी खास उपाय

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी बुधवारच्या दिवशी अंघोळ करून ध्यान करा. याशिवाय भगवान कृष्णाला बासरी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी उत्तर दिशेला असलेल्या खोलीमध्ये बासरी ठेवून द्या.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी बुधवारच्या दिवशी चांगल्या मनाने गणपतीची पुजा करावी. यावेळी गणपतीला मोदक आणि दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय उसाच्या रसाने तुम्ही गणपतीचा अभिषेक करू शकता.

बिझनेसमध्ये नफा हवा असल्यास

व्यवसायात प्रगती आणि नफ्यासाठी बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि त्यांना ११ किंवा २१ दुर्वा अर्पण करा आणि त्यांची प्रार्थना करा. हा सोपा उपाय अवलंबल्याने तुम्हाला व्यवसायात चांगलं यश मिळून पैसा मिळेल.

सुख मिळवण्यासाठी उपाय

बुधवारी बुध ग्रहाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवावा. यावेळी कच्च्या गायीच्या दुधात दुर्वा घाला आणि भगवान गणपती बाप्पाचा अभिषेक करा. या उपायाला खूप मान्यता आहे. असे केल्याने आनंद आणि सौभाग्य प्राप्त होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT