Panchank Yog: ३ जून रोजी शनी-सूर्य बनवणार पंचक योग; या राशींच्या हाती येणार पैसाच पैसा

Shani Surya Panchank Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि एकमेकांपासून ७२ अंशांच्या कोनात असणार आहे. ज्यामुळे हे दोन ग्रह पंचांक योग तयार कऱणार आहेत.
Dwadash Rajyog
Dwadash Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनि हा सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. २०२७ पर्यंत शनि मीन राशीत राहणार आहे. अशावेळी कोणत्या ना कोणत्या ग्रहाची त्याच्याशी युती किंवा दृष्टि असणार आहे. येत्या काळात शनि त्याचा पिता सूर्याशी युती करणार आहे. ज्यामुळे पंचक योग निर्माण होईल.

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये पिता आणि पुत्र असूनही सूर्य आणि शनि हे शत्रू मानले जातात. जून महिन्यात तयार होणारा पंचंक योग काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळवणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात

Dwadash Rajyog
Budh Gochar : ६ जूनपासून या ३ राशींना लागणार लॉटरी; बुध ग्रह मिळवून देणार पैसा

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा पंचंक योग फायदेशीर ठरू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. केवळ शांतीच नाही तर कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधही मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी मोठ्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळू शकते. लांब पल्ल्याचे प्रवास घडणार आहेत.

Dwadash Rajyog
June Grah Gochar: जून महिन्यात ४ ग्रह बदलणार रास; ३ राशींना मिळणार छ्प्परफाड पैसा

कर्क रास

या राशींसाठी शनि आणि सूर्याचा पंचक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. या काळात कुटुंबामध्ये असलेले गैरसमज दूर होऊ शकतात.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा पंचक योग अनुकूल ठरू शकतो. यामुळे जीवनात आनंद आणि शांती येणार आहे. या काळात तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्ही अनेक प्रवास करू शकता.

Dwadash Rajyog
Gajkesari Rajyog: 24 तासांनंतर 3 राशींच्या घरी पडणार पैशांचा पाऊस; गजकेसरी राजयोग करणार मालामाल

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com