श्री श्री रविशंकर
श्री श्री रविशंकर - Saam TV
लाईफस्टाईल

श्री श्री रविशंकर यांच्याशी संवादाची काही वेळात संधी

साम टिव्ही

पुणे :आर्ट ऑफ लिव्हिंगचे Art of Living प्रणेते, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर Sri Sri Ravishankar यांच्याशी संवादाची संधी आज २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० वाजता मिळणार आहे. webinar with Sri Sri Ravishankar of Art of Living

जीवनात शांती, मैत्री आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण मानवतेचा दृष्टोकोन अंगिकारून स्वतःमध्ये कशाप्रकारे बदल घडवू शकतो, याबद्दल श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत. यांसह भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या देशी गाईला रोजच्या जगण्यात महत्वाचे स्थान कसे देता येईल, याबद्दलही रविशंकर बोलतील. सकाळ Sakal माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार Abhijeet Pawar त्यांच्याशी संवाद साधतील. उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांच्या प्रश्नांनाही श्री श्री रविशंकर उत्तरे देतील.

हा कार्यक्रम झूम कॉलद्वारे होणार आहे. सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करून आपण या कॉलमध्ये सहभागी होऊ शकता. याशिवाय 'सकाळ'च्या फेसबूक facebook.com/SakalNews पेजवर आणि युट्यूब चॅनेलवरही youtube.com/c/SakalMediaGroup या कार्यक्रमाचा लाभ घेता येऊ शकतो.

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी स्कॅनकरा

श्री श्री रविशंकर वेबिनार QR Code

भारतीय देशी गायींच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी सकाळ माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक २१ सप्टेंबर रोजी 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन'सोबत प्रकाशित होत आहे. या विशेषांकात श्री श्री रविशंकर यांच्यासह तज्ज्ञ, संशोधकांचे लेख आणि देशी गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर यशस्वी उद्योग उभ्या करणाऱ्यांच्या यशकथांचा समावेश आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची बंगळूरजवळ गोशाला आहे. ही गोशाला देशातील सर्वोत्तम मानली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

Benifits of Cereals: डाळ खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

SCROLL FOR NEXT