How to Reduce Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या आरोग्याचा धोका वाढू शकतो. ओट्स, फायबरयुक्त फळं आणि भाज्या, लिंबू पाणी तसेच ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात योग्य समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास कशी मदत होऊ शकते, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याचं समजल्यानंतर ते लवकर नियंत्रणात आणण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधू लागतात. पण कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा कमी होणं ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे केवळ 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. घाईघाईने कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करणं आरोग्यासाठीही चांगलं नाही.

खरं तर, चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि रोजच्या जीवनशैलीत योग्य बदल केले तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. रक्तवाहिन्यांमध्ये साचणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करण्यासाठी आहारात कोणते 4 बदल करावेत, ते जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा हे 4 बदल

सकाळी रिकाम्या पोटी प्या लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असतं. त्यामुळे लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही लिंबू पाणी मदत करू शकतं, असं सांगितलं जातं.

नाश्त्यात ओट्सचा करा समावेश

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाणं फायदेशीर ठरू शकतं. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असतं. हे फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होण्यास मदत होऊ शकतं.

दररोज आहारातून 5 ते 10 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त विरघळणारं फायबर घेतल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नाश्त्यात ओट्सचा समावेश करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

फायबर असलेली फळं आणि भाज्या खा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. सफरचंद, नाशपती, राजमा आणि ब्रसेल्स स्प्राउट्स यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.

ऑलिव्ह ऑईल वापरा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश करता येतो. स्वयंपाक करताना या तेलाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. भाज्या करण्यासाठी किंवा रोजच्या स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल वापरता येतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राज ठाकरे 28 आणि 29 या दोन दिवसाच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस ट्रकला धडकली, १३ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT