Kidney Health freepik
लाईफस्टाईल

Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? 'या' हानिकारक सवयी ताबडतोब टाळा

Avoid Bad Habits: संतुलित आहार, भरपूर पाणी, नियमित व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास मूत्रपिंड निरोगी राहते आणि त्याचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे सुरू राहते.

Dhanshri Shintre

मूत्रपिंड हा आकाराने लहान असला तरी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव रक्त शुद्ध ठेवण्यासोबतच टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकतो. तसेच, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतो. परंतु, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढत आहे. यामुळे लहान वयातच किडनीशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत. मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यास हृदयावरही परिणाम होतो आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मूत्रपिंड एरिथ्रोपोएटिन हार्मोन तयार करून अस्थिमज्जाला लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करतात. तसेच, ते शरीरातील पीएच आणि पाण्याचे संतुलन राखतात. मात्र, चुकीच्या सवयी आणि असंतुलित आहारामुळे आपणच मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा निर्माण करत नाही आहोत का? या महत्त्वाच्या अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.

जास्त सोडियमयुक्त अन्न सेवन केल्याने रक्तदाब वाढतो, त्यामुळे मूत्रपिंडावर अधिक ताण येतो आणि त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढतो. ही सवय केवळ हृदयासाठीच नाही तर किडनीसाठीही हानिकारक ठरू शकते, त्यामुळे मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.

पुरेसे पाणी न पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ साचू लागतात, ज्यामुळे किडनी स्टोन आणि इतर समस्या होण्याची शक्यता वाढते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि किडनीच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी नियमित पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

या वाईट सवयी देखील समस्या वाढवू शकतात

- जास्त साखर आणि जंक फूडचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम करतात.

- धूम्रपान आणि मद्यपानामुळे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो. याचा परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर होऊन त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

- वेदनाशामक औषधांचे वारंवार सेवन केल्याने मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहोचू शकते, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

- जास्त प्रमाणात प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT