Tips for glowing skin saam tv
लाईफस्टाईल

Tips for glowing skin: सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर ग्लो हवाय? तज्ज्ञांनी दिलेल्या 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा

Simple tips for glowing skin: सणासुदीच्या दिवसांत प्रत्येकजण सुंदर आणि चमकदार दिसू इच्छितो. त्वचेची योग्य काळजी घेतल्यास, तुम्ही कमी वेळेत आणि कमी खर्चात नैसर्गिकरित्या उजळ आणि चमकदार त्वचा मिळवू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमची त्वचा चमकदार, त्वचेवर ग्लो हवा असल्यास आतापासूनच तयारीला सुरुवात केली पाहिजे. उत्सवाच्या काळात त्वचेच्या समस्यांना दूर करत नैसर्गिकरित्या त्वचा चमकदार कशी करता येईल याबद्दल त्वचाविकार तज्ज्ञांनी याठिकाणी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहे. या टिप्स लगेचच फॉलो करा आणि गणेशोत्सच्या तयारीला लागा.

गणेशोत्सव हा आनंदाचा, भक्तीचा आणि उत्सवाचा काळ आहे या काळात कुटुंबिय, मित्रपरिवाच्या भेटीगाठी होत असतात. उत्सवाच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते आणि आपली त्वचा चमकदार असावी असे प्रत्येकालाच वाटते. परंतु उत्सवाच्या तयारीमुळे उत्सवाच्या आधीचे दिवस हे धावपळीचे असू शकतात.

मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी सांगितलं की, या दिवसात घरातील स्वच्छता, खरेदी, पाककृती आणि बाहेरील खरेदीमुळे प्रचंड ताण येऊ शकतो. त्याचबरोबर प्रदूषण, दिवसाच्या सूर्यप्रकाशात फिरणं किंवा झोपेचा अभाव यामुळे निस्तेजपणा, टॅनिंग, ब्रेकआउट्स आणि कोरडेपणा यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. हे सर्व घटक तुमच्या त्वचेवर परिणाम करतात. तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतल्याने तुम्हाला उत्सवाच्या वेळी त्वचा निरोग राखण्याबरोबरच त्वचेवर चमक मिळविता येऊ शकते.

या आहेत खास टिप्स

हायड्रेशन

दररोज किमान ७-८ ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमची त्वचा नितळ, स्वच्छ आणि चमकदार दिसते.

त्वचेची स्वच्छता

त्वचेवरील धुळ, घाण, अतिरिक्त तेल आणि मेकअप काढून टाकण्यासाठी दिवसातून दोनदा सौम्य फेस वॉशचा वापर करा. जरी तुम्ही कितीही थकलेले असाल तरीही रात्रीच्या वेळी त्वचेचे क्लिंजिंग करण्यास कंटाळा करु नका. त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही मेकअप योग्यरित्या काढताय याची खात्री करा.

आठवड्यातून दोनदा एक्सफोलिएट करा

मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि रंग उजळण्यासाठी सौम्य अशा स्क्रबचा वापर किंवा घरी केलेले स्क्रब (जसे की ओट्स आणि मध) वापरा.

दररोज सनस्क्रीनचा वापर करा

जरी तुम्ही थोड्या काळासाठी बाहेर पडत असलात तरी, ५० पेक्षा जास्त ब्रॉड-स्पेक्ट्रम एसपीएफ असलेले सनस्क्रिन लावा. असे केल्याने तुमच्या त्वचेचे टॅनिंग आणि अकाली वृद्धत्वापासून संरक्षण होण्यास मदत होते.

शीट मास्क किंवा नैसर्गिक फेस पॅक वापरा

कोरफड, काकडी अशा नैसर्गीक घटकांनी बनलेले फेस मास्क वापरा. १४ दिवसांतून एकदा शीट मास्कचा वापर करा.

त्वचा नियमितपणे मॉइश्चरायझ करा

तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडा. चांगली मॉइश्चरायझ केलेली त्वचा मऊ, गुळगुळीत आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसते. योग्य मॉइश्चरायझर निवडताना तज्ञांची मदत घ्या.

संतुलित आहाराचं सेवन करा

तुमच्या आहारात फळे, पालेभाज्या, काजू आणि तेलबियांचा समावेश करा. तेलकट आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा, ज्यामुळे मुरुमांची समस्या येऊ शकते.

पुरेशी झोप घ्या

तुमची त्वचा रात्रभरातून निरोगी राहण्यासाठी ७-८ तासांची चांगली झोप घ्या. तुमच्या झोपेच्या दिनचर्येचे काटेकोरपणे पालन करा. या सोप्या टिप्स फॉलो करा आणि या उत्सवाच्या आनंद लूटा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमधील उर्से येथे सव्वा लाख रुपयांच्या किमतीचा ड्रग्स जप्त

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT