Traditional Cloths : सितारमम या फिल्म मधली अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने अगदी कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव गाजवलं आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय सुंदर होता.
या अभिनेत्रीने फक्त अभिनयानेच नाही तर, स्वतःच्या सौंदर्यावर देखील प्रसिद्धी मिळवली होती. स्वतःच्या अभिनयासह मृणाल तिच्या फॅशनलूकसाठी अतिशय चर्चेत असते. सोबतच मृणाल तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर कायम सक्रिय असते. सोबतच ती नवनवीन फॅशन (Fashion) निगडित पोस्ट शेअर करत असते.
वेस्टर्न पासून ट्रॅडिशनल पर्यंत सगळ्या लुकमध्ये अभिनेत्री (Actress) तिच्या चाहत्यांचे मन जिंकते. या अभिनेत्रीच्या लुक मधील एक लूक म्हणजे साडी लुक. मृणाल नेहमीच नवनवीन साड्या नेसून फोटो शेअर करत असते. तुझ्या फोटोला बघून असे वाटते की या अभिनेत्रीकडे एकापेक्षा एक साड्यांचे कलेक्शन आहे.
मृणालने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक नेहमी पोस्ट शेअर करत असते. या पोस्टमध्ये तिने गुलाबी रंगाची सिल्क पॅटर्नमधली साडी नेसली आहे. या साडीमध्ये मृणाल अतिशय सुंदर दिसत आहे. सोबतच मृणालच्या पदराचा रंग गोल्डन आणि ब्रॉड नेक असलेला ब्लाउज तीने वेअर केला आहे. सोबतच हा लुक कम्प्लीट करण्यासाठी तिने गोल्डन नेकलेस आणि त्याला साजेसे झुमके घातले आहेत.
व्हाईट रफल्ड साडी -
मृणालने आणखीन एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तिने सफेद रंगाची रफल्ड साडी नेसली आहे. ही साडी तिच्यावर खुलून दिसत आहे. या साडीचा ब्लाऊज सिल्वर रंगाचा असून त्यावर रेषांची डिझाईन आहे. सोबतच तिने केसांची फ्लॅट हेअर स्टाईल केली आहे. आणि नॅचरल मेकअप लुक ठेवला आहे. त्याचबरोबर तिने डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.
रेडी टू ड्रेप साडी -
आजकाल अनेक मुली साडी नेसतात. परंतु अनेक मुलींना साडी नेसता येत नाही. अशातच या दिवसांमध्ये मार्केटमध्ये रेडीमेड साडी देखील मिळते. मृणालने तिच्या या लुकमध्ये रेडी टू ड्रेप साडी वेअर केली आहे.
साडीचा आणि ब्लाऊजचा रंग गुलाबी असून , ब्लाउजवर सोनेरी रंगाचे नक्षीकाम आहे. सोबतच तिने सॉफ्ट मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडून आणि हलके कर्ल्स करून हेअर स्टाईल केली आहे. सोबतच तिने एक छोटा नेकलेस वेअर केला आहे आणि त्यावर साजेसे कानातले देखील घातले आहेत.
सोबतच मृणालने वाईन रंगाची आणि वाईट रंगाची साडी नेसून तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर फोटो पोस्ट केले आहेत. मृणालच्या या फॅशनला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सगळ्यात साड्यांच्या लुकमध्ये मृणाल अतिशय सुंदर आणि क्लास दिसत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.