Walking Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Walking Benefits : चालण्याचा पुरेपूर फायदा मिळवायचा आहे? तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shraddha Thik

Walking Tips :

तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे हा खूप चांगला व्यायाम आहे. जर तुम्ही व्यायाम करू शकत नसाल तर तुम्ही दररोज 15-20 मिनिटे वॉक करून संपूर्ण फिटनेस राखू शकता, परंतु काही वेळा काही लोक चालल्यानंतर पाय आणि कंबर दुखण्याची तक्रार करतात, त्यामुळे ते चालणे बंद करतात. जर तुम्हाला अशा समस्येला बळी पडायचे नसेल, तर चालताना काही गोष्टी लक्षात ठेवा, त्याबद्दल येथे जाणून घ्या.

चालताना (Walking) मान सरळ समोर ठेवा. खाली किंवा डावीकडे किंवा उजवीकडे पाहू नका. नेहमी पुढे बघून चालण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंचित खाली झुकलेली असावी.

पोट आतल्या बाजूने खेचून ठेवता आले तर चांगले. खांद्याची अधिक हालचाल असावी. चालताना पाठ सरळ ठेवा. पुढे किंवा मागे झुकून चालु नका.

तुमचे हात मोकळे करा आणि त्यांना स्वतःहून पुढे मागे होऊ द्या.

चालणे आणि जॉगिंग हे नेहमी चप्पल घालून नव्हे तर शूज घालूनच करावे. कपडे (Clothes) सैल आणि हवेशीर असावेत. घट्ट बसणारे कपडे घालू नका. खूप घट्ट इनरवेअर परिधान केल्याने हर्नियाचा धोका वाढू शकतो.

जर तुम्ही पहिल्यांदा चालायला सुरुवात करत असाल तर विशेषतः पाय ताणायला विसरू नका.

लक्षात घ्या की, तुम्हाला मार्चपास्ट करण्याची गरज नाही, फक्त सरळ चालत जा. चालताना तुम्ही संगीत ऐकू शकता. यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवान किंवा हळू संगीत ऐकू शकता. यामुळे मनाला आराम मिळतो, पण रस्त्यावरून चालताना संगीत ऐकू नका, ते धोकादायक ठरू शकते.

चालताना तोंडातून श्वास घेण्याची पद्धत तुम्हाला लवकर थकवू शकते. याशिवाय तोंड कोरडे होते आणि वारंवार तहान लागते. फुफ्फुसासोबतच संपूर्ण शरीराला योग्य ऑक्सिजन मिळत नाही आणि धूळही फुफ्फुसापर्यंत पोहोचते.

फोनवर बोलत असताना चालत जाऊ नका. त्यामुळे चालण्याचे फायदे कमी होतात, कारण शरीर आणि मन यांचा समन्वय आवश्यक असतो.

खूप थंडी वा खूप गरम असेल तर चालणे टाळा, त्यामुळे पक्षाघाताचा धोका होऊ शकतो. हिवाळ्यात न्यूमोनिया आणि दम्याच्या तक्रारीही वाढू शकतात.

टाचांवर दबाव टाकणे टाळा. पायाच्या बोटांवर दाब द्या, अन्यथा घोट्यात वेदना होऊ शकतात.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT