Daily headaches saam tv
लाईफस्टाईल

Daily headaches: रोज सकाळी झोपेतून उठलं की डोकं दुखतंय; ही 7 नेमकी कारणं, काय केलं की आराम मिळेल?

रोज डोकेदुखीचा त्रास होतोय? शरीरातील पाण्याची कमतरता, अपुरी झोप, मानसिक ताण, स्क्रीनचा जास्त वापर आणि वेळेवर जेवण न करणं ही त्यामागची कारणं असू शकतात. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकांना रोज डोकेदुखीचा त्रास होतो. काहीजण याकडे किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण सतत होणारी डोकेदुखी हलक्यात घेणं योग्य नाही. कारण डोकेदुखीमागे अनेक कारणं असू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता, वेळेवर जेवण न करणं, अपुरी झोप आणि ताण यांसारख्या गोष्टींमुळेही डोकं दुखू शकतं. त्यामुळे डोकेदुखी नेमकी कशामुळे होते आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी काय करावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

डोकेदुखी होण्यामागची प्रमुख कारणं

पुरेसं पाणी न पिणं

शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर डोकेदुखीचा त्रास होतो. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. याचा परिणाम मेंदूपर्यंत होणाऱ्या रक्तपुरवठ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखीची समस्या जाणवते.

वेळेवर जेवण न करणं

वेळेवर जेवण न करणं हेदेखील डोकेदुखीचं एक महत्त्वाचं कारण आहे. बराच वेळ उपाशी राहिल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. रिकाम्या पोटी राहिल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.

मोबाईल आणि कॉम्प्युटरचा जास्त वापर

आजकाल अनेकजण तासनतास मोबाईल किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. परंतु स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो. सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळे थकतात आणि त्याचा परिणाम डोकेदुखीच्या स्वरूपात दिसू शकतो.

पुरेशी झोप न घेणं

रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा पुरेशी झोप न घेणं यामुळेही डोकं दुखू शकतं. झोप पूर्ण न झाल्यास शरीर आणि मनाला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकं जड वाटू शकतं आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

जास्त मानसिक ताण घेणं

सतत चिंता करणं, एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणं आणि मानसिक ताण घेणं यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. जास्त ताणामुळे मायग्रेन किंवा तणावामुळे होणारी डोकेदुखी वाढू शकते. तसंच मान आणि डोक्याच्या आसपासचे स्नायू ताणले जातात. यामुळेही वेदना होऊ शकतात.

चुकीच्या पद्धतीने बसणं

अनेकजण काम करताना बराच वेळ चुकीच्या पद्धतीने बसतात. सतत पुढे वाकून बसणं किंवा मान खाली घालून काम करणं यामुळे मान आणि डोक्याच्या भागात वेदना होऊ शकतात. त्यामुळे बसण्याची पद्धत योग्य असणं गरजेचं आहे.

चहा-कॉफी अचानक कमी करणं

ज्यांना रोज जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे, त्यांनी अचानक त्याचं प्रमाण कमी केल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कॅफिनचं सेवन अचानक कमी केल्याचाही डोक्यावर परिणाम होऊ शकतो.

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काय कराल?

सत डोकं दुखत असेल आणि त्याचा रोजच्या कामावर परिणाम होत असेल तर सर्वात आधी आपल्या दैनंदिन सवयींकडे लक्ष द्या.

  • दिवसभरात पुरेसं पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.

  • जेवणाच्या वेळा पाळा. जास्त वेळ उपाशी राहणं टाळा.

  • दररोज किमान ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

  • मानसिक ताण कमी करण्यासाठी हलका व्यायाम, योगा किंवा ध्यान करण्याची सवय लावा.

  • या गोष्टी नियमित केल्यास मानसिक ताण कमी होण्यास आणि डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: BMC-SRA अधिकारांवर संघर्ष कायम, राज्य सरकारचा अंतिम निर्णय रखडला

HSC Exam Timetable : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत बदल; वाचा वेळापत्रक

Fancy No Plates: कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाय! फॅन्सी नंबर प्लेटसाठी मोजले 19 कोटी रुपये

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर पुन्हा धमाका! १५व्या दिवशी रचला नवा विक्रम, कमाई वाचून व्हाल थक्क

Maharashtra Fort : महाराष्ट्रातील अनोखा किल्ला! ज्याचा आकार आहे चक्क विंचवाच्या शेपटीसारखा, तुम्ही कधी पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT