Getting Up Early Morning Saam Tv
लाईफस्टाईल

Waking up Early Benefits : 90 दिवस सलग पहाटे ५ वाजता उठा; शरीरात दिसतील हे महत्वाचे बदल

Waking up Early : दररोज पहाटे 5 वाजता उठले तर आरोग्यात अनेक बदल दिसतील. तुम्ही कधी विचारही केला नसेल असे चमत्कारिक बदल तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मानसिकतेत पाहायला मिळतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये व्यक्तींची झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदललेली आहे. रात्री उशिरापर्यंत जागून कामे पूर्ण करणे अनेकांना सोयीचे वाटते. मात्र सकाळी लवकर उठणे सर्वांना त्रासदायक वाटते. सकाळी लवकर उठायला नको त्यामुळे बरेच जण रात्रीच आपली कामे करून ठेवतात. रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागे राहिल्यानंतर पहाटे उठणे अशक्य होते. प्रत्येक व्यक्तीला किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. मात्र जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला आणि दररोज पहाटे 5 वाजता उठले तर आरोग्यात अनेक बदल दिसतील. तुम्ही कधी विचारही केला नसेल असे चमत्कारिक बदल तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मानसिकतेत पाहायला मिळतील.

पहाटे पाच वाजता उठणे हे ऐकायला फार कठीण वाटते. सुरुवातीला तुम्हाला सकाळी लवकर उठणे जमणार नाही. पहाटे उठल्यानंतर देखील पुन्हा झोपावे वाटेल. मात्र सलग ९० दिवस तुम्ही असे केल्यास पहाटे लवकर उठण्याची सवय होईल. त्यामुळे आज या बातमीमधून आपण पहाटे पाच वाजता उठल्याने काय फायदे होतात तेच जाणून घेणार आहोत.

वजन कमी होते

पहिला फायदा तर हा होतो की तुमचे वजन कमी होते. पहाटे लवकर उठल्याने तुम्हाला संपूर्ण दिवसभर जास्त वेळ मिळतो. तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट स्वतः बनवता येतो. तसेच वर्कआउट देखील करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे आपोआप तुमचे वजन कमी होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. पहाटे उठल्यानंतर आठ वाजल्यापासून सूर्याची कोवळी किरणे आपल्या शरीरावर त्वचेवर पडतात. यातील विटामिन डी आणि जीवनसत्व आपल्याला सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत करते.

पचन व्यवस्थित होते

सकाळी उशिरा उठल्यानंतर आपल्याला आपली कामे आवरायचे असतात. या धावपळीत व्यवस्थित आहार होत नाही, परिणामी पचनक्रिया देखील बिघडते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचाव यासाठी मला पहाटे पाच वाजता उठण्याची सवय फायदेशीर ठरेल.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

लठ्ठपणामुळे अनेक व्यक्तींना हृदयाच्या समस्या जाणवतात. हृदयविकाराचा धोका देखील जाणवतो. तुम्ही देखील या सगळ्यांमधून जात असाल तर पहाटे पाच वाजता उठणे सुरू करा. कारण याने तुमच्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. हृदय निरोगी राहते. पहाटे उठणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही.

मेमरी शार्प होते

विद्यार्थी तसेच ऑफिसमध्ये काम करताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. काही व्यक्तींना सतत गोष्टी विसरण्याची सवय होते. यामुळे कामात बॅड इम्प्रेशन पडते. तुमच्याबरोबर देखील असे घडत असेल तर पहाटे पाच वाजता उठा. 5 वाजता उठल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT