Volkswagen Taigun Vs Jeep Renegade  Saam Tv
लाईफस्टाईल

Global Ncap Crash Test: अमेरिकेच्या Jeep ला मेड इन इंडिया SUV ने दिली टक्कर, क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार रेटिंग

अमेरिकेच्या Jeep ला मेड इन इंडिया SUV ने दिली टक्कर, क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5-स्टार रेटिंग

Satish Kengar

Volkswagen Taigun Vs Jeep Renegade : अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी जीपची भारतीय बाजारपेठेत कामगिरी ढासळत चालली आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या प्रसिद्ध SUV Renegade बाबत आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये एसयूव्हीला फक्त एक स्टार मिळाला.

एवढेच नाही तर कार निर्मात्यावर अमेरिकन बाजारपेठेत आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेच्या रेटिंगबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे भारतीय बनावटीच्या Volkswagen Taigun ने सुरक्षेच्या बाबतीत जबरदस्त कामगिरी केली आहे. याच क्रॅश टेस्टमध्ये मेड-इन-इंडिया एसयूव्हीने 5-स्टार रेटिंग मिळवले आहे.

आज लॅटिन अमेरिकेसाठी न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (NCAP) द्वारे घेण्यात आलेल्या क्रॅश टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये Taigun ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे आणि Jeep Renegade ला फक्त एक स्टार मिळाला आहे. जीप Renegade जागतिक बाजारपेठेत खूप प्रसिद्ध आहे, परंतु या सेफ्टी रेटिंगबद्दल कंपनीवर आरोप झाले आहेत. एनसीएपीच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जीपने या एसयूव्हीच्या जुन्या मॉडेलच्या सेफ्टी रेटिंगचा प्रचार करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे.  (Latest Marathi News)

Jeep Renegade बद्दल बोलायचे झाले तर, ब्राझिलियनमध्ये बनवलेल्या जीप Renegade ला क्रॅश टेस्टमध्ये फक्त एक स्टार मिळवला आहे. टेस्टमध्ये मॉडेलला मानक म्हणून फक्त 2 एअरबॅग मिळतात. SUV ने प्रौढ सेफ्टीसाठी 48.71% आणि लहान मुलांच्या सेफ्टीसाठी 66.71% मिळवले. याशिवाय पादचाऱ्यांच्या सेफ्टीसाठी 45.32% गुण मिळाले आहे.

Volkswagen Taigun

भारतात बनवलेल्या फोक्सवॅगन Taigun ला या क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. Taigun च्या ज्या मॉडेलची टेस्ट घेण्यात आली, त्यात मानक म्हणून 6 एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबलिटी कंट्रोल (ESC) सारखी सेफ्टी फीचर्स आहेत. SUV ने प्रौढांच्या सेफ्टीमध्ये 92.47%, मुलांच्या सेफ्टीत91.84%, पादचाऱ्यांच्या सेफ्टीमध्ये 55.14% गुण मिळवले आहेत.  (Latest Auto News in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT