Vodafone-Idea Service Stop Saam Tv
लाईफस्टाईल

Vodafone-Idea Service Stop : उद्या रात्री 8 वाजल्यापासून बंद होणार Vodafone-Idea ची सेवा, ग्राहकांना मिळणार नाही लाभ !

22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे.

कोमल दामुद्रे

Vodafone-Idea Service Stop : देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

कंपनी आपल्या ग्राहकांना संदेश पाठवत आहे की त्यांची प्रीपेड सेवा 13 तासांसाठी बंद असेल. 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान ग्राहक फोन रिचार्ज करू शकणार नाहीत.

1. 13 तास राहणार सेवा बंद

कंपनी आपल्या सर्व प्रीपेड ग्राहकांना संदेश पाठवून अलर्ट जारी करत आहे. कंपनीच्या संदेशात असे म्हटले आहे की प्रीपेड रिचार्ज सुविधा 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून बंद होईल. ही सेवा 13 तास बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी 23 जानेवारी रोजी सकाळी 9.30 नंतर सुरू होईल. कंपनीने हा संदेश आपल्या सर्व प्रीपेड वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पाठवला आहे.

Vodafone-Idea Service Stop

या काळात कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे, त्यामुळे आधीच अलर्ट करण्यात येत आहे. तुम्ही जर Vodafone-Idea चा प्रीपेड नंबर वापरत असाल आणि तुमचे रिचार्ज संपणार असेल, तर आजच रिचार्ज करा. अन्यथा 13 तास अडचणीत असाल.

2. कंपनी करतेय अनेक अडचणीचा सामना

Vodafone-Idea मोठ्या कर्जाच्या ओझ्याशी झुंजत आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. परवाना शुल्कही भरण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. परवाना शुल्क सरकारला (Government) भरता न आल्याने कंपनीला (Company) परवाना रद्द करण्याची अडचण निर्माण झाली आहे. कंपनीला परवाना शुल्क म्हणून 780 कोटी रुपये भरायचे होते पण व्होडाफोन-आयडिया केवळ 78 कोटी रुपये देऊ शकली आहे. अडचणींचा सामना करत असलेल्या वोडाफोन-आयडियाने आतापर्यंत 5G सेवाही सुरू केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT