Kerala Tourist Place
Kerala Tourist Place Saam Tv
लाईफस्टाईल

Kerala Tourist Place : यंदाच्या सुट्टीत भेट द्या केरळमधील 'या' सौंदर्य स्थळांना !

कोमल दामुद्रे

Kerala Tourist Place : दरवर्षी केरळ भेट देण्यासाठी दहा लाखापेक्षा अधिक जास्ती पर्यटक येत असतात. भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटक म्हणून केरळ कडे बघितले जाते.

भारतातील या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश-विदेशातून भरपूर प्रमाणात लोक येत असतात. न्यूयॉर्क टाइम्सने 2023 मधील भेट देण्याच्या 52 ठिकाणांची जाहीर सादर केली आहे. भारतातील (India) केरळ राज्याने आपले स्थान निर्माण केलेले आहे.

या यादी मध्ये केरळ हे राज्य १३ क्रमांकावर आहे. केरळ या ठिकाणी जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तेथे या प्रमुख पर्यटन (Travel) स्थळांना नक्की भेट द्या त्याविषयी माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.

1. मुन्नार

Munnar

मुन्नार हे दक्षिण भारतातील या मोठ्या चहा बागाच्या क्षेत्रापैकी एक आहे. मुन्नार हे राज्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. येथील उंच पर्वत पर्यटकांना आकर्षित करणारे आहे त्यामुळे हे ठिकाण जोडप्यांसाठी (Couple) हनिमून डेस्टिनेशन देखील आहे. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असे हे मुन्नार शहर एकदा तरी पाहिलेच पाहिजे.

2. वायनाड

Vaynad

केरळमधील सुंदर ठिकाणांपैकी वायनाड हे एक आहे. हे ठिकाण मसाल्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक लेण्या,धबधबयाने समृद्ध असे हे शहर आहे. हे पूर्ण क्षेत्र हिरवाईने नटलेले आहे एक गट म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही येथील डोलणारे भातपीक सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करते.

3. कुमारकोम

Kumarkom

कुमारकोम हे छोटा बेटांचा समूह आहे केरळ येथे प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. कुमारकोम येथील पक्षी (Birds) अभयारण्य 14 एकरामध्ये बांधलेले पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये तुम्हाला येथेस्नेक-बोट रेस आनंद घेता येईल.

4. कोवलम

kovalam

हे शहर सूर्यास्त आन आयुर्वेदिक बॉडी मसाजसाठी जगप्रसिद्ध आहे. मोठ्या संख्येने दरवर्षी लोक इथे सूर्यास्त पाहण्यासाठी येतात.तुम्ही केरळला फिरायचा प्लॅन करत असाल कोवलम या ठिकाणी नक्की भेट दया.

5. वागमोन

vagamon

वागमोन याठिकाणची जंगले याचे नैसर्गिक सौंदर्य अधिक जास्ती वाढवते.तुम्हाला जर नैसर्गिक सौंदर्य पाहायला आवडत असेल.तर तुम्ही या ठिकाणी जाऊन नैसर्गिक सौंदर्यचा आनंद घेऊ शकता.हे ठिकाण अनेकदा चित्रपटात दाखवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

SCROLL FOR NEXT