Mahashivratri Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri : यंदाच्या महाशिवारात्रीला भेट द्या 'या' प्राचीन शिव मंदिरांना !

Shivratri Puja : भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता असे मानले जाते.

कोमल दामुद्रे

Lord Shiva Temple : प्रत्येक वर्षी महाशिवरात्री साजरी करण्यासाठी लोकांमध्ये वेगळाच उत्साह असतो. महादेवाचे भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता असे मानले जाते. तेव्हापासून लोक हा दिवस अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा करतात.

लोकांचा असा विश्वास आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यास त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. आपल्या देशात अनेक शिवमंदिरे आहेत, जे परदेशातही प्रसिद्ध आहेत.

यामुळे आज आम्ही तुम्हाला यूपी आणि उत्तराखंड येथील मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रार्थना केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात देशभरातून लोक येतात. तुम्ही देखील या शिवरात्रीला तुमच्या कुटुंबासोबत या मंदिरांना भेट देऊन महादेवाचे दर्शन घेऊ शकता.

1. काशी विश्वनाथ मंदिर उत्तरप्रदेश

kashi vishwananth temple

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ मंदिरला म्हणतात. हे मंदिर वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. असे म्हटले जाते की, बनारस शहर महादेवाच्या त्रिशुलावर विसावलेले आहे. तसेच लोकांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतल्याने सर्व पाप धुतले जातात.

2. गोळा गोकर्णनाथ उत्तरप्रदेश

Gokarnanath Uttar Pradesh temple

यूपी येथील लखीमपूर मध्ये गोला गोकर्णनाथ मंदिर स्थित आहे. याला छोटी काशी म्हणून ओळखले जाते. गोला गोकर्णनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून लोक येतात. असे म्हणतात की,जेव्हा सत्ययुगात रावण शंकर महादेवाला लंकेत घेऊन जात होता तेव्हा रावणाच्या मनात शंका आल्याने त्याने महादेवाला (Lord Shiva) जमिनीवर ठेवले. त्यानंतर लाखो प्रयत्न करूनही लंकापतींना ते शिवलिंग उचलता आले नाही. आजही येथील शिव लिंगावर रावणाच्या अंगठ्याचे ठसे आहेत असे म्हणतात.असे हे ठिकाण गोळा गोकर्णनाथ म्हणून प्रसिद्ध आहे

3. उत्तराखंड येथील केदारनाथ ज्योतिर्लिंग

Kedarnath Temple

उत्तराखंडमध्ये अनेक प्राचीन शिवमंदिर आहेत.तेथील केदारनाथ ज्योतिर्लिंग हे प्राचीन मंदिरांपैकी (Temple) एक आहे ज्याला महादेवाचे निवस्थान म्हटले जाते. या मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येतात. केदारनाथमध्ये असलेल्या शिवमंदिराच्या तिन्ही बाजू डोंगरांनी वेढलेल्या आहेत.

4. नीलकंठ महादेव

Nilkanath Temple

नीलकंठ महादेव हे मंदिर ऋषिकेशपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे. असे म्हणतात की देव आणि असुराने अमृत मिळवण्यासाठी येथे समुद्रमंथन केले होते. त्यामुळे या मंथनातून विष बाहेर पडल्यावर ते विष भगवान महादेव प्याले ज्याने त्यांचा घसा निळा झाला. म्हणून येथे निळकंठ महादेव या मंदिराची स्थापना करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT