Vasubaras 2023 Puja Vidhi Vasubaras - Saam Tv
लाईफस्टाईल

Vasubaras 2023 Puja: वसुबारसला गाय वासराची पूजा करताय? नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Govatsa Dwadashi 2023: आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वसुबारसची पूजा केली जाते.

कोमल दामुद्रे

Vasubaras 2023 Date:

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण. या दिवशी आपल्याला सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. दिवाळीतला पहिला सण हा वसुबारस.

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी गोपूजनाला अधिक महत्त्व असते. महाराष्ट्रातील काही भागात शेणाची गोवर्धन पर्वताची प्रतिमा उभारुन पूजा केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा दिवाळीतला पहिला सण वसुबारस हा ९ नोव्हेंबरला साजरा (Celebrate) केला जाणार आहे. यादिवशी गाईची पूजा का केली जाते? पूजा करताना नियम (Rules) काय जाणून घेऊया.

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताखाली गाई गुरांना एकत्र करुन त्यांचे रक्षण केले, त्याबद्दल या पर्वताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पूजन करण्यात येते. असे म्हटले जाते की, समुद्रमंथनातून पाच कामधेनूची उत्पती झाली होत्या. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गाईची पूजा केली जाते.

1. गोवर्धन पूजा कशी कराल? (Vasubaras 2023 Puja Vidhi)

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे.

  • स्वच्छ कपडे परिधान करुन ध्यान करावे.

  • घरात गाय-वासराची मूर्ती किंवा प्रतिमा तयार करा.

  • यानंतर तांदूळ, खीर, बताशा, पाणी, दूध, पान, केशर, फुले, दिवा लावून गोवर्धनाची पूजा (Puja) करावी.

  • तसेच श्रीकृष्णाचे ध्यान करावे.

2. पूजा मुहूर्त (Vasubaras 2023 Puja Muhurt)

वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी ०५.३१ मिनिटे ते ०८.०९ मिनिटांपर्यंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT