Manasvi Choudhary
दिवाळी येताच सर्वत्र दिवाळी पार्ट्यांना सुरूवात होते.
बॉलिवूड कलाकारांमध्येही दिवाळीचे विशेष आकर्षण असते.
बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिवाळी पार्टीचे आयोजन करतात.
नुकतेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने बॉलिवूड स्टार्ससाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
यावेळी बॉलिवूड स्टार्सच्या सौंदर्याने चार चाँद लावले. यावेळी रेखा सोनेरी आणि काळ्या रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत होती.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोडीने लक्ष वेधून घेतले.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट साडीवर शर्वरीने वनस्ट्रीप डिपनेक ब्लाऊज कॅरी केला आहे.
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दिक्षीत पती श्रीराम नेनेसोबत दिसली.
गुलाबी रंगाच्या कुर्ता प्लाझो सेटमध्ये ऐश्वर्या खुपच सुंदर दिसत होती.
क्रिती सेनॉनसह अभिनेत्री जान्हवी कपूर, गौरी खान, अर्जुन कपूर, सारा अली खान उपस्थित होते.