घरात वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्याने किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुमच्या घरात गरीबी येण्याची ज्यामुळे गरिबी येते. वास्तूशास्त्रामध्ये गरिबीला कारणीभूत ठरणारे इतर अनेक घटकही सांगण्यात आले आहेत.
वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे वास्तू उपायही दिले आहेत. हे उपाय नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते. या दिशेत फर्निचर, जड पेट्या, कचराकुंडी किंवा शौचालय यांसारख्या जड वस्तू ठेवल्याने पैशाच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो.
घराच्या नैऋत्य कोपऱ्यात खड्डा किंवा बोअरिंग असल्यास आजार आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं.
जर मुख्य दरवाजा तुटलेला किंवा अस्वच्छ असेल, तर ते देवी लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यापासून रोखतात. शिवाय वास्तूनुसार, काळा दरवाजा किंवा काळसर मुख्य दरवाजा दारिद्र्यालाही कारणीभूत ठरतो.
वास्तूनुसार, नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर असणं समृद्धीस अडथळा ठरतो. शिवाय, स्वयंपाकघरात रात्रभर अस्वच्छ भांडी ठेवल्याने गरिबी ओढवते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चपला आणि बूट विखुरलेले असल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
घरातील ओलसरपणा किंवा भिंतींना पडलेल्या भेगा किंवा बराच काळ बंद असलेली घड्याळं यामुळे देखील घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते.
घर जितकं स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तितकी सकारात्मक ऊर्जा घरात येते.
घराची ईशान्य दिशा म्हणजेच ईशान कोपरा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशित ठेवावा.
घराची नैऋत्य दिशा इतर दिशांपेक्षा उंच ठेवावी.
सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून घरात नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी पूजा करावी आणि कापूर जाळावा.
घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी तुळशीचं रोप नक्की लावा. घर पुसताना पाण्यात थोडं साधं मीठ घाला. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.