Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरातील या दिशेला लावा तांब्याचा सूर्य, भाग्य देईल साथ; घरात नांदेल सुख-समृद्धी

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Copper Sun At Home :

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट ही शुभ आणि अशुभ मानली जाते. त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. घराच्या सजावटीमध्ये चित्रे, फुले आणि रंगांची विशेष काळजी घेऊन घराच्या सौंदर्यासोबतच आनंद आणि सौभाग्य देखील वाढू शकते.

अनेक जण घराच्या (Home) मुख्य दरवाजाला तांब्याचा सूर्य लावतात. आशीर्वाद आणि सुखासाठी तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच व्यक्तीचे भाग्य सूर्यासारखे चमकू लागते. जीवनात धन-संपत्तीची कमतरता नसते आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहाते. परंतु, घरात तांब्याचा सूर्य लावल्याने बसवण्यापूर्वी वास्तूविषयी (Vastu Tips) काही गोष्टी जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार दिशेला अधिक महत्त्व आहे. घरातील प्रत्येक कोना हा शुभ आणि अशुभतेवर अवलंबून असतो. त्या जागी कोणतेही चुकीची वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यासाठी घरात कोणतीही वस्तू आणताना काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी.

  • वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य ठेवणे शुभ मानले जाते.

  • घराच्या दारावर किंवा खिडकीवर लावू शकता किंवा शक्य नसल्यास भिंतीवर लावावा.

  • ज्या भागात घरात देवघर आहे त्याच्या उत्तर -पूर्व भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे फायदेशीर मानले जाते.

  • दिवाणखान्यात तांब्याचा सूर्य ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

  • नोकरी- व्यवसायात प्रगतीसाठी तुम्ही ऑफिसमध्ये पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य लावू शकता.

  • वास्तूनुसार घराच्या बेडरुममध्ये तांब्याचा सूर्य ठेवू नये.

  • वास्तूनुसार ऑफिसमध्ये तांब्याचा सूर्य ठेवल्याने काम आणि व्यवसायात अपार यश मिळते. तसेच सूर्य देवाची विशेष कृपा देखील राहाते. आर्थिक स्थिती मजबूत होते.

  • तांब्याचा सूर्य घराची सकारात्मक ऊर्जा वाढवतो. ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT