Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : बिझनेस सुरु करण्यापूर्वी या वास्तू टिप्स लक्षात ठेवा, कामात मिळेल यश

Vastu Tips For Negativity : प्रत्येकी व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करत असतो परंतु, कामात यश मिळत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Business :

प्रत्येकी व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करत असतो परंतु, कामात यश मिळत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकजण नोकरी बदलतात किंवा कामात काही ना काही नवीन काम सरु करण्याचा प्रयत्न करतात.

वास्तुशास्त्रात (Vastu Tips) नवीन काम सुरु करण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही नवीन व्यापार करण्याचा विचार असाल तर तुम्हाला मदत होईल. नवीन व्यापार सुरु केल्यानंतर अनेकदा घरात नकारात्मकता जाणवते. तसेच आपापसात वाद देखील होतात.

परंतु, व्यापारात दिशा ही अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर अधिक परिणाम होतो. जर तुम्ही देखील नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत असाल तर या टीप्स (Tips) लक्षात ठेवा

  • कोणतेही नवीन काम सुरु करण्यापूर्वी योग्य जागा निवडा. तसेच शुभ ठिकाणही निवडा.

  • शुभ मुहूर्तावर काम सुरु केल्यास यश मिळते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

  • दुकान किंवा ऑफिसमध्ये बसण्याची दिशा ही अधिक महत्त्वाची मानली जाते. यासाठी तुम्ही दुकानात किंवा ऑफिसमध्ये नैऋत्य दिशेला बसा. योग्य दिशेला बसल्याने कामात यश मिळते.

  • दुकानात किंवा ऑफिसमध्ये टेबल आणि खुर्च्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. वास्तुनुसार टेबल आणि खुर्च्यावरील घाणामुळे नकारात्मक ऊर्जा येते.

  • दुकानात किंवा ऑफिसमध्ये फिश टँक ठेवत असाल तर रखडलेले पैसे मिळतात. तसेच पैशांच्या अनेक समस्यांपासून सुटका होते.

  • वास्तुशास्त्रानुसार दुकान किंवा ऑफिसमध्ये पांढरा, क्रिम किंवा हलक्या रंगाचा वापर करा. या रंगांमधून सकारात्मकता मिळते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT