Rose Day 2024 Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Rose Day 2024 Recipe : 'रोझ डे' ला बनवा स्पेशल कोकोनट गुलाबाचे लाडू, पार्टनर होईल खुश; पाहा रेसिपी

Valentine Week Special Recipe : जर तुमचा पार्टनर फूडी असेल आणि यंदाचा रोझ डे तुम्हाला खास बनवायचा असेल तर तुम्ही चविष्ट पदार्थ बनवून खाऊ घालू शकता. ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा टिकून राहील. कोकोनट गुलाबाचा लाडू ट्राय करु शकता पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

How To Make Coconut Rose Ladoo :

फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेलक जोडीदार आपल्या पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करतात. पण बरेचदा पार्टनरला खुश करण्यासाठी त्याला आवडणारे पदार्थ खाऊ घालू शकतात.

जर तुमचा पार्टनर (Partner) फूडी असेल आणि यंदाचा रोझ डे तुम्हाला खास बनवायचा असेल तर तुम्ही चविष्ट पदार्थ बनवून खाऊ घालू शकता. ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा टिकून राहील. कोकोनट गुलाबाचा लाडू ट्राय करु शकता पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • सुके खोबरे - १/२ कप

  • कंडेन्स्ड मिल्क - १/२ कप

  • रोझ सिरप - १ मोठा चमचा

  • गुलाबजल - २ मोठे चमचे

  • तूप - २ चमचे

  • मिक्स्ड ड्राय फ्रूट्स - १/२ कप

  • भाजलेले शेंगदाणे- मूठभर

  • बदाम - मूठभर

  • गुलाबाच्या पाकळ्या

2. कृती

  • कोकोनट (Coconut) गुलाबाचे लाडू बनवण्यासाठी सर्वातआधी कढई गरम करुन घ्या. त्यात चमचाभर तूप घालून सर्व ड्रायफ्रूट्स चांगले तळून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.

  • त्याच कढईत १ चमचा तूप टाकून सुके खोबरे घालून चांगले भाजून घ्या.

  • सुके खोबरे लालसर झाल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क, रोझ सिरप आणि गुलाबजल घाला आणि सतत ढवळत राहा.

  • मिश्रण चांगले शिजल्यावर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स टाका. त्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्याही घाला.

  • तयार होईल लाडूचे मिश्रण. त्यानंतर गॅस बंद करुन मिश्रण थंड होण्यास ठेवा. यानंतर लाडू वळवा.

  • तयार होतील गोल गरगरीत कोकोनट गुलाबाचे लाडू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT