लाईफस्टाईल

Vaccination Campaign : पालकांनो, संसर्गजन्य रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लस प्रभावी, दुर्लक्ष करु नका

Health News :काही आजारांना लहानपणी देण्यात येणाऱ्या लसींनी प्रतिबंध करता येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Child Care Tips :

मुलांसाठी लसीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण ते त्यांना जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. पालकांनी मुलांचे लसीकरण चुकवू नये.

काही आजारांना लहानपणी देण्यात येणाऱ्या लसींनी प्रतिबंध करता येतो. ते केवळ लसीकरण केलेल्या मुलांचे संरक्षण करत नाही तर रोगांचा प्रसार रोखण्यास देखील मदत करते. काही पालकांनी लसीच्या सुरक्षिततेबद्दल किंवा त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल चिंता सतावू शकते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबतची माहिती दिली आहे, पुण्यातील लुल्लानगरमधील मदरहुड हॉस्पीटलचे डॉ अतुल पालवे, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात रोग तज्ज्ञ म्हणतात पालक मुलांच्या लसीकरणाबाबत टाळाटाळ करतात. मात्र तसे न करता पालकांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लसींना सार्वजनिक वापरासाठी मान्यता मिळण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता तपासली जाते. लहान मुलांमध्ये गंभीर संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण फायदेशीर ठरते.

1. लसीकरणास विलंब नको

लस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करून अँटीबॉडीज तयार करतात. गोवर, गालगुंड, रुबेला, पेर्टुसिस (डांग्या खोकला), पोलिओ सारख्या इतर आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करतात. या रोगांमुळे लसीकरण न झालेल्या लहान मुलांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते तर, काहीवेळेस मृत्यू देखील ओढावू शकतो.

लस देण्यास उशीर केल्यास किंवा टाळाटाळ केल्यास लसीकरण न झाल्याने आजाराचा धोका वाढतो. काही वैद्यकीय कारणांमुळे लस न घेऊ शकणार्‍या लोकांनाही त्याचा धोका असतो. वेळच्यावेळी लसीकरण केल्याने केवळ आपले आणि आपल्या मुलांचे रक्षण होत नाही तर संसर्गजन्य रोगांचा (Disease) प्रसार रोखण्यास मदत होते. प्रत्येकासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यातही लसीकरण गरजेचे आहे.

लस केवळ मुलांचे (Kids) संरक्षण करतात असे नाही तर त्या आजाराशी लढण्याकरिता प्रतिकारशक्ती तयार करतात. जेव्हा मोठ्या संख्ये विशिष्ट रोगाविरूद्ध लसीकरण केले जाते, तेव्हा त्याचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते. मुलांना लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी करण्यातही मदत होऊ शकते. जर काही कारणास्तव त्यांना लसीचा डोस वेळेवर मिळाला नाही, तर ते एखाद्या धोकादायक आजाराने ग्रस्त होऊ शकतात किंवा त्या रोगाचे वाहक बनू शकतात. अशा प्रकारे ते रोगाच्या प्रसारामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात.

बालपणातील लसीकरणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सार्वजनिक आरोग्यावर त्याचा होणारा परीणाम, लसीकरणाने जागतिक स्तरावर आणि भारतामध्ये पोलिओ (Polio) आणि गोवर सारख्या रोगांचे निर्मूलन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तरुणांमध्ये लसीकरणाचा उच्च दर सुनिश्चित करून भविष्यातील जगण्याचा दर आणखी वाढवता येऊ शकतो.

आपल्या मुलांचे वेळेवर लसीकरण ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. असे केल्याने आपण आपली आणि आपल्या समाजाची मदत करू शकतो आणि आपल्या मुलांना आरोग्यदायी जीवन देऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT