Benefits of almond, skin care, Skin care tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

तारुण्यपण टिकून ठेवण्यासाठी बदामाचा असा करा उपयोग

आपल्या सगळ्यांना असे वाटत असते की, आपली त्वचा नेहमी तरुण राहावे.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या सगळ्यांना असे वाटत असते की, आपली त्वचा नेहमी तरुण राहावे. जस जसे आपले वय वाढते तस तसे आपले बारीक रेषा किंवा सुरकुत्या स्पष्टपणे दिसू लागतात.

हे देखील पहा -

सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. त्यासाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेवर अनेक बदल दिसून येतात. बदलत्या ऋतूमानानुसार आपली त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊ लागते. आपले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बदामाचा वापर करु शकतो. बदामात जीवनसत्त्व ई भरपूर प्रमाणात असते त्यामुळे उन्हाळ्यात देखील त्याचे संरक्षण होते. तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.

१. बदामाचा पेस पॅक आपण लावू शकतो. मसूरच्या डाळीत बदामाची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावू शकतो. यामुळे तरुण बनण्याबरोबरच मृत त्वचेच्या पेशी देखील निघून जाण्यास मदत होते.

२. आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आपण बदामाच्या पावडरमध्ये केसर (Saffron) मिक्स करुन त्वचेला लावू शकतो. यात आपण कच्चे दुध देखील घालावे व काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

३. चेहऱ्याचा (Skin) रंग उजळण्यासाठी आणि त्याचा पोत सुधारण्यासाठी बदाम फार उपयुक्त आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते व त्वचा अधिक मुलायम बनते. त्वचेला मॉइश्चरायजर करुन डाग घालवण्यास मदत करते.

४. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने डोळ्याखालील असणाऱ्या काळ्या वर्तुळाजवळ मालीश केल्यास फायदा होईल. असे रोज केल्यास डार्क सर्कल्स कमी होतील.

५. बदामाचे तेल हे नॅचरल सनस्क्रीन म्हणून काम करते. त्वचेचे उन्हापासून संरक्षण करते व तसेच सूर्याच्या वाईट किरणांना लांब ठेवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishalgad Fort History: सह्याद्रीतील प्राचीन गड, जाणून घ्या विशालगड किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

SCROLL FOR NEXT