Smartphone Saam Tv
लाईफस्टाईल

Upcoming Smartphone: फोन घ्यायचा विचार करताय? डिसेंबर महिन्यात होणार आहेत हे नवीन फोन लाँच; पाहा लिस्ट

Smartphone: स्मार्टफोन हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. अनेक लोक सतत स्मार्टफोन बदलत असतात. तुम्हीही जर स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर हे काही नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming Smartphone In December:

आजकाल स्मार्टफोन सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. सर्वजण स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोनमुळे आपल्याला जगातील सर्व माहिती एका क्लिकवर समजते. अनेक लोक सतत स्मार्टफोन बदलत असतात. तुम्हीही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे स्मार्टफोनचे हे पर्याय आहे. डिसेंबर महिन्यात हे स्मार्टफोन लाँच होणार आहेत.

Oneplus 12

स्मार्टफोनमध्ये वनप्लस ही खूप नावाजलेली कंपनी आहे. वन प्लसच्या स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी उत्तम असते. लवकरच Oneplus 12 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. 6 डिसेंबरला हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच होणार आहे. यात Qualcomm चा नवीनतम चिपसेट, Snapdragon 8 Gen 3 SOC मिळणार आहे. तसेच 5400 mAh बॅटरी मिळू शकते. या फोनमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा सपोर्टही मिळेल.

Realme GT 5 Pro

Realme GT 5 Pro हा स्मार्टफोन 7 डिसेंबरला चीनमध्ये लाँच होणार आहे. येत्या वर्षात हा स्मार्टफोन भारतात लाँच होईल. यामध्ये राउंड कॅमेरा मॉड्यूल देण्यात येईस. स्मार्टफोनमध्ये 5400 mAh बॅटरी, Snapdragon 8 Gen 3 SOC आणि 4500 nits चा पीक ब्राइटनेस मिळू शकतो.

Infinix Smart 8 HD

Infinix Smart 8 HD हा स्मार्टफोन 8 डिसेंबरला भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये 90hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6 इंच डिस्प्ले मिळेल. या स्मार्टफोनमध्ये नवीन मॅजिक रिंग फिचर मिळेल.

Redmi 13C

Redmi कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी 6 डिसेंबरला Redmi 13C हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले मिळू शकतो. तसेच MediaTek Helio G99 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी असू शकते.

Infinix Hot 40

Infinix कंपनीचा अजून Infinix Hot 40 स्मार्टफोन या महिन्यात लाँच होणार आहे. 9 डिसेंबरला हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होईल. यामध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 50MP प्राथमिक कॅमेरा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT