Hyundai Upcoming Cars 2023 Upcoming Cars
लाईफस्टाईल

Upcoming Cars : Hyundai भारतात लॉन्च करणार छोटी SUV, Tata Punch ला देणार टक्कर

Hyundai Upcoming Cars 2023 : Hyundai भारतात लॉन्च करणार छोटी SUV

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming Cars 2023 : Hyundai भारतीय बाजारपेठेत एक नवीन छोटी SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारला AI3 असे कोडनेम देण्यात आले आहे. कंपनी याला Grand i10 Nios च्या वर ठेवणार आहे. कंपनीने याचा टीझर देखील रिलीज केला आहे.

Hyundai AI3 ची निर्मिती Grand i10 Nios सारख्याच प्लॅटफॉर्मवर केली जाईल. छोट्या SUV ची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन कंपनी पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या नवीन तरुण ग्राहकांना टॅप करण्याचा प्रयत्न करेल.

Hyundai AI3 एका वेगळ्या लूकसह येणार आहे. ह्युंदाईच्या चेन्नई प्लांटमध्ये जुलै महिन्यापासून याचे उत्पादन सुरू केले जाऊ शकते. कंपनी ऑगस्ट महिन्यात सणासुदीच्या आधी ही कार बाजारात आणू शकते. (Latest Marathi News)

या छोट्या एसयूव्हीमध्ये स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअप, एलईडी डीआरएल दिले जाईल. याची हेडलाइट डीआरएलच्या खाली ठेवली जाईल. तसेच यात ह्युंदाईच्या सांता फेमध्ये दिसल्याप्रमाणे डीआरएलमध्ये एच पॅटर्न देण्यात येऊ शकतो.

त्याचबरोबर यात मागील बाजूस एलईडी लाइट बार आणि नव्याने डिझाइन केलेली टेल लाईट दिली जाऊ शकते. Hyundai AI3 ची लांबी 3.8 मीटर असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यामध्ये Grand i10 Neos सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

इंजिन

कंपनी यामध्ये 1.2-लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देऊ शकते. या छोट्या एसयूव्हीमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय असणार नाही.

ह्युंदाई सध्या एसयूव्ही सेगमेंटवर राज्य करत आहे आणि क्रेटा, व्हेन्यू सारख्या कंपनीचे मॉडेल्स मार्केटवर वर्चस्व गाजवत आहेत. अशा परिस्थितीत कंपनीला छोट्या एसयूव्ही सेगमेंटमध्येही स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहे. Hyundai AI3 बाजारात टाटा पंच, Citroen C3 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

किती असू शकते किंमत?

या Hyundai कारची किंमत 6 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते, ज्यामुळे ती इतर कंपन्यांच्या एंट्री लेव्हल मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते. सध्या सरासरी 10,000 पेक्षा जास्त युनिट्स विकल्या जाणार्‍या या सेगमेंटमध्ये टाटा पंच आघाडीवर आहे.

ह्युंदाईने अलीकडेच कारच्या किमतीत वाढ केली आहे, जी 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे. कंपनीने सर्व मॉडेल्स आणि व्हेरियंटमध्ये समान वाढ केलेली नाही, ती स्वतंत्रपणे वाढवली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT