भारतात दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवास करताना अनेकांना तो सोपा आणि सुकर व्हावा असे वाटते. पण रेल्वेतून प्रवास करताना अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नाही.
कार, जीप, बस आणि ट्रकसह रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना स्टेअरिंग असते. अशाप्रकारे वाहन वळवले जाते. पण ट्रेन वळवण्यासाठी स्टेअरिंगचा वापर का केला जात नाही. हा प्रश्न कदाचित अनेकांना कधी तरी पडला असेलच. जाणून घेऊया त्याबद्दल
खरेतर ट्रेन (Railway) ड्रायव्हर म्हणजेच लोको पायलट ट्रेन फिरवू शकत नाही. ट्रेन एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर नेण्यासाठी काम दुसरे कोणीतरी करते. मग ट्रेनमध्ये स्टेअरिंग नसताना ट्रेन कशी वळते? ती दुसऱ्या ट्रॅकवर कशी जाते? दिशा कशी बदलते? याविषयी जाणून घेऊया.
ट्रेन वळवण्यासाठी ट्रकची महत्त्वाची भूमिका असते. ट्रेन तांत्रिक गोष्टींवर कार्य करते. इतर वाहनांप्रमाणे (Vehicles) स्टेअरिंगद्वारे वळत नाही कारण ती रस्त्यावर धावत नाही. ट्रेनचे ट्रॅक स्वत: स्टेअरिंगचे काम करतात. ट्रेन कुठे आणि कोणत्या ठिकाणी वळणार हेही आधीच ठरवले जाते. ट्रेन वळवण्यात लोको पायटलची भूमिका नसते.
1. पॉइंट्समन कोण असतो? ट्रेन वळवण्यात त्याची भूमिका काय?
रेल्वेमध्ये एक कर्मचारी आहे ज्याला ट्रेन वळवण्यासाठी म्हणजेच ट्रॅक बदलणारा अर्थात पॉइंट्समन म्हणून ओळखले जाते. रेल्वे ट्रॅक बदलण्याचा निर्णय लोको पायलट नाही तर स्टेशन मास्टर घेतो. कोणत्या स्टेशनच्या (Station) कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबवायची आणि कोणत्या स्टेशनवर थांबायची नाही हे रेल्वे मुख्यालय ठरवते. ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबवायची किंवा कुठे वळवायची हे लोको पायलट स्वतः ठरवू शकत नाही.
2. लोको पायलट काय करतो?
ट्रेन चालवण्याची संपूर्ण जबाबदारी लोको पायलटवर असते. हे काम त्याला गार्डच्या मदतीने करावे लागते. सिग्नल पाहून लोको पायलट ट्रेन चालवण्याचा, थांबवण्याचा आणि वेग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतो. ट्रेनचा वेगही लोको पायलटद्वारे नियंत्रित केला जातो. लोको पायलट ट्रॅकला समांतर ठेवलेल्या साइन बोर्डवर बनवलेल्या सिग्नलच्या आधारे ट्रेनचा वेग वाढवतो किंवा कमी करतो. आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधता येत नाही, तेव्हा ट्रेनच्या मागील डब्यात उपस्थित असलेल्या गार्डशी संवाद साधला जातो आणि योग्य निर्णय घेणे हे लोको पायलटचे काम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.