Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Health Tips : सावधान! ब्रेड, बटर आणि जेवणाचे तेल आरोग्यासाठी घातक, ICMR चा सल्ला

Health Tips News : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या रिपोर्टनुसार ब्रेड, बटर आणि जेवणासाठी वापरले जाणारे तेल आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

Ruchika Jadhav

आजच्या धावपळीच्या जगात लोकांना जेवायला आणि जेवण बनवायलाही वेळ मिळत नाही त्यामुळे ही लोकं शॉर्टकट मार्गाचा वापर करतात. या लोकांच्या जेवणात मोठ्या प्रमाणात अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा समावेश असतो जे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे त्यांचा वेळ तर वाचतो पण आरोग्य मात्र धोक्यात येते.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या रिपोर्टनुसार ब्रेड, बटर आणि जेवणासाठी वापरले जाणारे तेल आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. या पदार्थांना अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांच्या विभागात टाकले आहे. 'ग्रुप सी' च्या खाद्य पदार्थांमध्ये कारखान्यामध्ये बनवण्यात येणारे ब्रेड, तृणधान्ये , चिप्स, केक, बिस्कीट, फ्राइज, सॉस, मेयोनीज , आइस्क्रीम , प्रोटीन पावडर, पीनट बटर, सोया चंक्स यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश आहे. तसेच चीज, लोणी, मांस, तृणधान्ये, बाजरी, सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ, एनर्जी ड्रिंक, दूध, कोल्ड्रिंक, पनीर आणि ज्यूस यांसारख्या गोष्टींना देखील 'ग्रुप सी' मध्ये ठेवले आहे.

अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ म्हणजे काय?

विविध धान्यांचे पीठ हे कारखान्यात उच्च पातळीवर दळले जाते जेणेकरून ते बरेच दिवस खराब होणार नाही आणि यासाठी कृत्रिम घटक त्यामध्ये मिसळले जातात. अशाचप्रकारे ताज्या फळांना खराब होऊ नये म्हणून फ्रिज करून ठेवले जाते. दूधाला देखील पाश्चराइज्ड केले जाते.

या सर्व प्रक्रियेमुळे या पदार्थांमधील पोषक घटक निघून जातात. या पदर्थांना चांगली चव, रंग आणि गुणवत्ता येण्यासाठी तसेच दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी यामध्ये खायचा रंग, कृत्रिम साखर मिसळली जाते जे आरोग्यासाठी घातक ठरते. यालाच अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ म्हणतात.

अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे अनेक आजार होतात

अभ्यासातून असे दिसून आले की, मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ खाल्ल्यास लठ्ठपणा येतो, हृदयाच्या समस्या निर्माण होतात, मधुमेहाचा धोका वाढतो, लवकर वृध्दत्व येते इत्यादी अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. एकंदर अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक मानले आहे. या अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते तर पोषक तत्वांचा यात अभाव असतो. फायबरचे प्रमाणही कमी असते.

यात सर्वात मोठी समस्या ही आहे की, असे खाद्यपदार्थ साधारणपणे खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतात. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने 'ग्रुप सी' च्या पदार्थांचे जास्त सेवन टाळण्याची शिफारस केली आहे. या पदार्थांमध्ये साखर आणि मीठ तुम्हाला नक्कीच कमी मिळेल पण त्यासोबत आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पोषक घटकांचा मात्र यात अभाव राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT