Diabetes: धावणे आणि चालण्याच्या सवयीतून मधुमेहाचा धोका कमी होईल; रिसर्चमधून उघड

Diabetes : पौष्टिक आहार, व्यायम तसेच धावणे आणि चालण्याच्या सवयीने डायबिटीजचा धोका कमी होतो. हे केल्याने त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळता येतो.
Diabetes Prevention
Diabetes PreventionSaam Tv
Published On

Diabetes Prevention:

सध्या वातावरणात खूप जास्त बदलत आहे. त्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवययींमुळे अनेक आजार पसरतात. त्यात डायबिटीजचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. डायबिटीजच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

डायबिटीजच्या रुग्णांनी पौष्टिक आहार, व्यायम आणि योगासने करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. हे केल्याने त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळता येतो.

डायबिटीज म्हणजे काय?

डायबिटीजच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील इतर अवयवांना त्रास होतो. डायबिटीज हा आजार कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांना नुकसान पोहोचवते. रक्तातील साखर नियंत्रणात न राहिल्याने हे आजार होतात. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.

WHO नुसार, या रुग्णांना डायबिटीजचा धोका सर्वात जास्त असतो

ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे. त्यांना डायबिटीज होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना हा आजार लवकर होतो. तसेच ज्या व्यक्तीच्या घरात भाऊ, बहिण किंवा पालकांना टाइप २ चा डायबिटीज असतो. त्यांना याचा धोका आहे. जे व्यक्ती जास्त शारीरिक हालचाल करत नाही. त्या लोकांना डायबिटीजचा धोका जास्त असतो.

Diabetes Prevention
आयुष्यात विद्यार्थ्यांनी Chanakya Nitiच्या या शब्दांचे पालन करा, प्रत्येक पायरीवर मिळेल यश

जगभरात तब्बल ५३७ मिलियन लोकांना डायबिटीज हा आजार आहे. तर देशात १०१ मिलियन लोकांना डायबिटीजचा धोका आहे. तसेच मुंबईमध्ये डायबिटीजच्या रुग्णांमध्ये २० टक्के रुग्ण हे वृद्ध आहेत.

डायबिटीजवर उपाय

एका रिपोर्टनुसार, डायबिटीजच्या रुग्णांनी शारीरिक हालचाल केली पाहिजे. त्यासाठी चालणे किंवा धावणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. १ किलोमीटर चालणे हेदेखील डायबिटीजचा धोका कमी करतो.

एका रिपोर्टनुसार शारीरिक हालचाल त्यात चालणे असो वा धावणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नवीन संशोधनानुसार चालण्याचा वेग - सरासरी 6 किमी प्रति तास डायबिटीजचा धोका ३९% कमी करतो. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी शारिरीक व्यायम, हालचाल करायला हवी.

Diabetes Prevention
Yoga Tips : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी रामबाण ठरेल हे योगासन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com