UGC NET 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

UGC NET 2024 : नेट परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

UGC NET Exam Date : २०२४ मध्ये UGC NET ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

UGC NET 2024 Exam :

UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२४ मध्ये UGC NET ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १० जून पासून सुरु होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी UGC NET परीक्षेच्या तारीखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार UGC NET 2024 परीक्षा १० जून ते २१ जून २०२४ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत त्यांनी nta.ac.in वर अधिक तपशील पाहू शकता.

UGC NET सत्र १ कम्प्युटर आधारित चाचणी (CBT)मोडमध्ये आयोजित केली जाईल. याचा निकाल परीक्षा (Exam) संपल्यानंतर तीन आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. सर्व CBT परीक्षांचे निकाल (Result) परीक्षा संपल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत घोषित केले जातील असे अधिकृत माहिती मिळाली आहे.

यूजीसी नेट परीक्षा साधरणत: वर्षातून दोनदा घेतली जाते. जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. याची तारीख आणि वेळापत्रक (Time table) लवकरच जाहीर करण्यात येईल. परीक्षेच्या आणखी माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

NTA देशभरातील निवडक शहरांमध्ये 83 विषयांसाठी जून २०२४ मध्ये UGC NET आयोजित करेल. उमेदवार परिशिष्ट -3 मधील विषयांची यादी आणि कोड तपासू शकता. तसेच अधिकृत वेबसाइट्स UGC NET परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajapur Tourism : वीकेंडला 'राजापूर'ला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' १० ठिकाणं पाहायला अजिबात विसरू नका

केस गळणं थांबेल! स्वयंपाकघरातील 'या' ४ गोष्टींपासून घरीच बनवा जादूई तेल

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

MLC Election : बंडखोरी थांबली! अब्दुल सत्तारांचा मुलगा उमेदवारी अर्ज घेणार मागे

Blue bruises on skin: कोणतीही दुखापत नसतानाही शरीरावर पडतात निळे डाग? यामागे असू शकतात हे आजार

SCROLL FOR NEXT