Typhoid Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Typhoid Disease : सतत जंक फूड खाताय? होऊ शकतो टायफॉइड, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Typhoid Causes : बदलेल्या वातावरणानुसार आपण अनेक आजारांना सहज बळी पडतो. बदलेल्या जीवनशैलीनुसार आणि खाण्यापिण्याच्या सवयींनुसार आपण जंक फूड खातो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Typhoid Symptoms :

बदलेल्या वातावरणानुसार आपण अनेक आजारांना सहज बळी पडतो. बदलेल्या जीवनशैलीनुसार आणि खाण्यापिण्याच्या सवयींनुसार आपण जंक फूड खातो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

जर तुम्ही देखील सतत बाहेरचे जंक फूड खात असाल तर तुम्हाला टायफॉइड सारखा गंभीर आजाराला बळी पडू शकतो. हा आजार (Disease) संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो. परंतु, काही वेळेस बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने देखील हा आजार होतो. त्यामुळे बदलत्या हवामानात आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे.

1. टायफॉइड कसा होतो?

साल्मोनेला टायफी बॅक्टेरियाने संक्रमित झालेले अन्न आणि पाणी प्यायल्याने हा आजार होतो. हा आजार बाहेरचे जंकफूड आणि खराब पाणी प्यायल्याने होतो. याशिवाय टायफॉइड झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातूनही टायफॉइड होऊ शकतो. खाण्यामार्फत पसरु शकतो.

2. टायफॉइडची लक्षणे

  • पोटदुखी

  • डोकेदुखी

  • संपूर्ण शरीरात वेदना

  • थंडी जाणवणे

  • घाम येणे

3. काळजी कशी घ्याल?

1. द्रव पदार्थांचे सेवन

या आजारात शरीरातील पाण्याचे (Water) प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा. कारण ते पचायला हलके असते. यामध्ये फळांचा ज्यूस, नारळ पाणी, लिंबू पाणी इत्यादींचे सेवन करु शकता.

2. कर्बोदके

आहारात अधिक कर्बोदकांचे सेवन असायला हवे. यात फळे, कस्टर्ड, उकडलेली अंडी,भात खाल्ल्याने ऊर्जा मिळते. टायफॉइडच्या आजारात याचे सेवन केल्यास आराम मिळतो.

3. हेल्दी पदार्थ

या काळात पोटात अन्नपदार्थ सहज पचत नाही त्यामुळे गॅसेसची समस्या उद्भवते. यासाठी बेसन चिला, उपमा किंवा नाचणीच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय डाळी, खिचडी, हिरव्या भाज्या, गाजर आणि पपईचे सेवन करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT