Tulsi Vivah 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Tulsi Vivah 2023 : वैवाहिक जीवनात येणारे प्रत्येक अडथळे दूर होतील, तुळशी विवाहाच्या दिवशी हे 5 उपाय करा

Tulsi Vivah Upay : तुळस आणि ऊसाचा विवाह हा एका वधू-वर यांच्या विवाहाप्रमाणेच आयोजित केला जातो.

Shraddha Thik

Tulsi Vivah :

यंदा तुळशी विवाह 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी ऊस आणि तुळशीचा विवाह केला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी हे शुभ कार्य करेल, त्यांच्या घरात लवकरच लग्नाची लगबग सुरू होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कौटुंबिक जीवन (Life) आनंदाने होईल. मुलीच्या लग्नाप्रमाणेच तुळस आणि ऊसाचा विवाहही आयोजित केला जातो. त्यामुळे ज्यांना मुलगी नाही ते यंदा 23 नोव्हेंबरला तुळशीचे विवाह करून कन्यादानाचे पुण्य मिळवू शकतात.

तसेच ज्या लोकांना मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची अडचण येत आहे, ते देखील लवकरच दूर होतील आणि मुलीला योग्य नवरा मिळेल. अशाप्रकारे तुळशी विवाह (Wedding) सोहळ्यानंतर तुळशीचे रोप आणि ऊस योग्य ब्राह्मणाला दान केले जाते. जाणून घेऊया तुळशी विवाहाच्या दिवशी कोणते विशेष उपाय करावेत.

तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय करून पहा

जर तुमच्या मुलीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीची पाच पाने घेऊन त्यावर हळदीचा तिलक लावा आणि श्रीकृष्णाला अर्पण करा.

तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी शोधायचा असेल तर 'ॐ नमो भगवते नारायणाय' चा जप करा. मंत्राचा जप करताना तुळशीच्या रोपाला केशर आणि थोडे दूध मिसळलेले पाणी अर्पण करावे. तसेच भगवान विष्णूला केशर मिश्रित दूध अर्पण करा.

जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते आनंदी आणि मधुर बनवायचे असेल तर या दिवशी तुळशीच्या रोपाला श्रृंगाराचे सामान अर्पण करून पूजा करावी आणि पूजेनंतर सर्व वस्तू विवाहित महिलेला भेट द्याव्यात.

जर तुम्हाला तुमच्या मुलाचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि तुळशीच्या रोपाची योग्य प्रकारे पूजा करावी आणि वेलचीची जोडी भगवानाला अर्पण करावी. पूजेनंतर, ती वेलची जोडी तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून स्वीकारण्यासाठी द्या.

जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर तुम्ही दोघांनी दक्षिणावर्ती शंख पाण्याने भरून श्री विष्णूला अर्पण करावे. तसेच मंदिराच्या प्रांगणात किंवा कोणत्याही बागेत तुळशीचे रोप लावावे आणि त्याची निट जोपासना करावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

Pune Traffic: पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध

नागपूरचं झालं वासेपूर, चुकीचा रस्ता दाखवून पर्यटकांची लूट, चाकूचा धाक दाखवून 8 लाखांचं सोनं लंपास

SCROLL FOR NEXT