Tips to manage stress, Mental stress ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मानसिक तणाव दूर करण्यासाठी ही थेरेपी ट्राय करा

तणाव हे सगळ्याच्या जीवनाचा भाग जणू बनले आहे.

कोमल दामुद्रे

मुंबई : आज ज्या काळात प्रत्येक व्यक्ती ही मानसिक तणावामुळे त्रस्त आहे. या तणावाचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे.

हे देखील पहा-

बदलेलील कामाची वेळ (Time), अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व सतत छोट्या छोट्या गोष्टीत चिंता केल्यामुळे आपल्याला मानसिक ताण येतो. हा त्रास कमी व जास्त होऊ शकतो. परंतु, तणाव हे सगळ्याच्या जीवनाचा भाग जणू बनले आहे. यावर वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पुढे जाऊन हा एक गंभीर आजार देखील बनू शकतो. आपण ताणतणाव (Stress) दूर करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल.

आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ती सतत छोट्या छोट्या गोष्टींचा अधिक ताण घेतो. तणावाच्या सुरुवातीच्या काळात दीर्घ श्वास घेऊन त्याला नियंत्रणात ठेवता येते व तणावाची पातळी कमी होते. श्वास घेण्याच्या पध्दतीकडे लक्ष द्या.

१. तणाव कमी करण्यासाठी इतरांमध्ये मिसळा. त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणे खूप आवश्यक आहे. स्वत:ला व्यस्त ठेवा.

२. व्यायाम, योगा किंवा झुंबा, एरोबिक्स सारखे व्यायाम करा. यामुळे आपल्याला तणाव दूर करता येईल आणि आपण दिवसभर व्यस्त असल्यामुळे नकारात्मक गोष्टींबद्दल कमी विचार करू शकतो.

३. नित्यक्रमात सकस आहाराचा समावेश करा. आहारातून जंक फूड आणि बाहेरील गोष्टी पूर्णपणे काढून टाका. स्वतःला आनंदी ठेवा. अशावेळी आपण हसण्याचा व्यायाम किंवा काही कॉमेडी शो पाहू शकतो. दररोज किमान ८ तासांची झोप घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

Maharashtra Live News Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ला, राजकीय षडयंत्र

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

SCROLL FOR NEXT