Winter Hair Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीच्या समस्या दूर होतील वापरून पहा हे मास्क

हिवाळ्यात आपण जास्ती गरम पाण्याच्या वापर करतो त्यामुळे केस पातळ होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात आपल्याला स्किनच्या समस्या जाणवतात तर फक्त स्किनच्याच नाही तर अनेक लोकांना केसगळतीच्या समस्याना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात आपण जास्ती गरम पाण्याच्या वापर करतो.

त्यामुळे केस (Hair)पातळ होतात आणि कमजोर होऊन सहज गळायला लागतात कधी ऑफिस मध्ये,कधी घरी, तर कधी केसांना ऑइल (Oil) लावताना,केसात नुसता हात जरी टाकला तरी केस सहज गळून हातात येतात.

या समस्या हिवाळ्यात जास्ती प्रमाणात जाणवतात. हिवाळ्यात केसांची काळजी कशी घेयायची यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही मास्क ज्यामुळे तुमची नुसती केसगळतीच थांबणार नाही तर केस अधिक मजबूत होतील आणि शाईन करतील.

मध आणि बदामचा वापर करून हेअर मास्क बनवा -

3 ते 4 चमच मध ,बदाम पेस्ट एक छोटा चमच आणि 2 चमच मलाई किंवा क्रीम घ्या.आता सर्वात अगोदर बदाम आणि मध एकत्र मिक्स करून ठेवा नंतर मलाई किंवा क्रीम का हलका फेस येईल पर्यंत फेटून घ्या.

त्यानंतर बदाम आणि मधाचे मिश्रण यामध्ये एकजीव करून घ्या आता तयार मिश्रण केसच्या मुळापासून लावून घ्या आणि अर्धा तास तसच सोडून द्या. अर्ध्या तासाने केस छान शॅम्पूने वॉश करा.हा मास्क हिवाळ्यात नक्की ट्राय करून पहा याने तुमच्या केसाचा ड्रायनेस कमी होईल.

खोबरेल तेल आणि व्हिनेगर,मधापासून हेअर मास्क -

खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेमंद आहे. हा मास्क बनण्यासाठी खोबरेल तेल,मध,व्हिनेगर आणि सफरचंदच्या वरील सालपट हे सर्व एक एक चमचा घ्या आणि सर्व एका बाऊल मध्ये टाकून एकजीव करून हे मिश्रण तुमच्या माथ्यापासून खाली केसान पर्यंत लावून 30 मिनिटांसाठी सोडून द्या. त्यांनतर तुमचे केस स्वच्छ वॉश करून कंडीशनर लावायला विसरू नका.

कढीपत्ता आणि खोबरेल तेल वापरून हेअर मास्क बनवा -

कढीपत्ता हा केसांनसाठी उपयुक्त आहे याने केस काळे आणि मजबूत होण्यास मदत होते.कढीपत्ता आणि खोबरेल तेल याचा एकत्र वापर करून केसांच्या समस्या दूर करू शकतो.

10-12 कढीपत्ता आणि 2 चमचा खोबरेल तेल एका बाऊल मध्ये टाकून गरम करून घ्या. जोपर्यंत ते फुटत नाही तोपर्यंत गरम करून घ्या.थंड झाल्यावर केसांना लावून अर्धा तास राहून द्या.त्यानंतर हेअर वॉश करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यात गोळी घातली, गाडीतून बाहेर फेकलं अन्...., पुण्यातील हत्याकांडाचा भयानक CCTV समोर

Political News : बदलापूरमध्ये शिंदेंचा भाजपाला दे धक्का! बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

Bihar Election Result: लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार? नेमका गेम कुठे फिरला?

Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

SCROLL FOR NEXT