Fashion tips, how to choose hand bags
Fashion tips, how to choose hand bags ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

कपड्यांच्या स्टाइलनुसार या स्टायलिश हँडबॅग्ज खरेदी करुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतामध्ये पारंपारिक गोष्टींना विशेष महत्त्व आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कपाटात सलवार सूट किंवा कुर्ती पायजामाचे ४-५ सेट नक्कीच असतील.

हे देखील पहा -

भारतीय महिलांमध्ये (Womens) सलवार सूट घालण्याची क्रेझ नेहमीच असते. आपल्यापैकी काहींना सलवार सूट इतके आवडतात की, आपण घरातील प्रत्येक फंक्शनमध्ये कुर्ती पायजामा परिधान करतो. तसेच, आपला कुर्ती पायजामावरील लूक क्लासी बनवण्यासाठी आपण काही वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकतो. हल्ली हँडबॅग्जची क्रेझ वाढत आहे. आपण प्रत्येक पोशाखासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा नेण्यास सुरुवात केली आहे. तर आपण कपड्यांच्या स्टाइलनुसार या स्टायलिश हँडबॅग्ज कशा वापरायच्या ते पाहूया.

१. हेवी वर्क केलेला सलवार सूटसोबत आपण साधी आणि दर्जेदार लेदर बॅग कॅरी करू शकतो. हे खरेदी (Shopping) केल्याने आपला लूक वाढू शकतो आणि यात आपण आपल्या सर्व वस्तू लेदर बॅगमध्ये सहज ठेवू शकतो. चामड्याच्या पिशव्यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे डिझाईन्स आणि रंग मिळतील जे आपण आपल्या सूटनुसार निवडू शकतो.

२. लग्नाच्या फंक्शनसाठी सलवार सूट परिधान करत असाल तर, पोटली बॅगचा आपण विचार करु शकतो. पोटली बॅगमुळे आपल्याला पारंपारिक लुक मिळतो. तसेच, यावर विविध प्रकारच्या डिझाईन्स मिळतात. आपण आपल्याला हव्या त्या रंगानुसार त्या निवडू शकतो.

३. सलवार सूटसोबत आपण फॅब्रिकची बॅगही कॅरी करू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांना फॅब्रिक बॅग आवडत नाही परंतु, फॅब्रिक बॅग स्टायलिश लुक द्यायला मदत करते. आपल्याला शोल्डर फॅब्रिक बॅगमध्ये विविध प्रकारच्या बॅग्ज मिळतील. मोठी बॅग, कॉटन (Cotton) बॅग, लांब बॅग, लहान बॅग आदी आपण आपल्या आवडीनुसार खरेदी करू शकतो.

४. आपण प्लाझो-सूट, कुर्तीसोबत क्लच पर्सही कॅरी करू शकतो. आपल्याला क्लच पर्सचे विविध प्रकार बाजारात मिळतील. या पर्स आपण कोणत्याही सूटसोबत अतिशय स्टायलिशपणे कॅरी करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ​महाविकास आघाडीच्या इचलकरंजीतल्या सभेत चेंगराचेंगरी

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Rahul Gandhi News | महायुतीच्या प्रचार सभेत राहुल गांधींचा जयघोष

Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Menstrual Care: मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात का? 'हे' उपाय केल्यास पोटदुखी कमी होईल

SCROLL FOR NEXT