Traffic Challan Rules Saam Tv
लाईफस्टाईल

Traffic Challan Rules: वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी पकडले? कागदपत्रे नाहीत? अशावेळी काय कराल?

Caught By The Traffic Police While Driving with No Doument : तुम्ही देखील ड्रायव्हिंग करत असाल आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, कागदपत्रे नाहीत अशावेळी काय कराल?

कोमल दामुद्रे

Traffic Challan Rules in India:

भारतात वाहतूकीचे कडक नियम लागू करण्यात आले आहे परंतु, त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील करण्यात येते. कोणत्याही रस्त्यावरुन प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे.

बरेचदा आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यानंतर आपण घाबरतो. कित्येक वेळा नियमांचं पालन करुनही वाहतूक पोलीस दंड आकारतील असा गैरसमज देखील केला जातो. देशात ड्रिंक अँड ड्राईव्हबाबत कडक नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

जर तुम्ही देखील ड्रायव्हिंग (Driving) करत असाल आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, कागदपत्रे नाहीत अशावेळी काय कराल? कायद्यामध्ये याबाबत कोणती तरतूद आहे. कागदपत्रे सोबत नसताना दंड भरावा लागेल का? असे अनेक प्रश्न जर तुम्हालाही पडले असतील तर जाणून घेऊया कायदेतज्ज्ञ अमित शिंदे यांच्याकडून

अॅड. अमित शिंदे म्हणतात की, दुचाकी किंवा चारचाकी चालवताना एखाद्याला पोलिसांनी पकडले आणि कागदपत्रे नसतील तर घाबरुन जाऊ नका. अशावेळी सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल्सच्या १३९ नियमानुसार आपल्या वाहनांचे कागदपत्रे (Documents) एखाद्या वर्दीतील पोलिसांनी मागितले तर त्यांना देऊ शकतो. परंतु, जर आपल्याकडे गाडीची कागदपत्रे जसे की, Driving Licence, RCTC Book, Insurance, PUC त्यावेळेला नसतील तर आपण त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, DigiLocker मधून त्यांना दाखवू शकतो.

1. कागदपत्रे नसल्यास काय कराल?

अॅड. अमित शिंदे म्हणतात की, जर तुमच्याकडे गाडीची कागदपत्रे नसतील तर पंधरा दिवसांच्या आतमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे मागितली त्यांना आपण रजिस्टर पोस्टाने त्याची पत्र पाठवू शकतो. आपल्याकडे कागदपत्रे असताना देखील दंड घेतला असेल तरीसुद्धा पंधरा दिवसांच्या आत आपण त्याची प्रत रजिस्टर पोस्टाने पाठवली तर आपला दंड रद्द होऊ शकतो. त्यामुळे गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT