Toyota Urban Cruiser Ebella google
लाईफस्टाईल

Toyota EV: टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक Urban Cruiser Ebella लाँच; 543 KM रेंज, 7 एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी बरंच काही, वाचा सविस्तर माहिती

Toyota Electric SUV: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज भारतातील बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) सेगमेंटमध्ये आपला पहिला प्रवेश करत ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला सादर केली.

Sakshi Sunil Jadhav

टोयोटाच्या ३० वर्षांच्या जागतिक इलेक्ट्रिफाईड मोबिलिटी तज्ज्ञतेवर आधारित, अर्बन क्रूझर एबेला ही गाडी आकर्षक एसयूव्ही डिझाइन, प्रशस्त व प्रीमियम केबिन, प्रगत तंत्रज्ञान आणि मृदू व आत्मविश्वासपूर्ण इलेक्ट्रिक परफॉर्मन्स यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. हे वाहन ४९ केव्हॅट आणि ६१ केव्हॅट बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून, ६१ केव्हॅट बॅटरीसह एका चार्जवर ५४३ किमी (ARAI प्रमाणित) ड्रायव्हिंग रेंज देते.येत्या २० जानेवारीपासून बुकिंग सुरू असून किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Toyota electric SUV

‘अर्बन टेक’ डिझाइन संकल्पनेवर आधारित एबेला मध्ये हॅमरहेड फ्रंट, एलईडी हेडलॅम्प्स, १८-इंच अलॉय व्हील्स आणि आकर्षक एसयूव्ही स्टान्स आहे. केबिनमध्ये ड्युअल-टोन इंटिरिअर, पॅनोरामिक रूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, १२ रंगांची अॅम्बियंट लाइटिंग, JBL साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

toyota Urban Cruiser EV

सुरक्षिततेसाठी या वाहनात लेव्हल २ अँडास, ७ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि टोयोटाच्या जागतिक मानकांनुसार सुरक्षा प्रणाली उपलब्ध आहे.

ग्राहकांसाठी ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी, Battery-as-a-Service, Assured Buy Back आणि भारतभर ५००+ BEV सक्षम सेवा केंद्रांद्वारे निश्चिंत मालकी अनुभव देण्यात येणार आहे.

toyota Urban Cruiser EV

अर्बन एसयूव्ही कॉन्सेप्टवर आधारित हे वाहन टोयोटाच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा असून, ग्राहकांना विविध इलेक्ट्रिफाईड पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देत भारताच्या ऊर्जा सुरक्षितता व डीकार्बोनायझेशनच्या उद्दिष्टांना यांमुळे पाठबळ मिळाले आहे.

नव्या एबेलाच्या सादरीकरणाच्या प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा म्हणाले की, ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला ही आमच्या मल्टी-पाथवे दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. ज्याद्वारे आम्ही कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने वाटचाल करताना कोणालाही मागे न ठेवण्याचा प्रयत्न करतो. या वाहनाच्या माध्यमातून आम्ही भारताच्या हरित मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला पाठिंबा देण्याची आमची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करतो. आमचे मजबूत उत्पादन पोर्टफोलिओ, तंत्रज्ञान नेतृत्व, उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा व विस्तृत डीलर नेटवर्क याच्या जोरावर आम्ही शाश्वत मोबिलिटीचे उद्दिष्ट साध्य करू.”

तर यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक तादाशी असाझुमा, डेप्युटी म्हणाले, “इलेक्ट्रिफाईड तंत्रज्ञानामध्ये टोयोटाला तीन दशकांचा जागतिक अनुभव आहे. यामुळे आज जगभरात ३८ दशलक्षांहून अधिक इलेक्ट्रिफाईड वाहने रस्त्यावर असून, ग्राहकांनी मिळून १९७ दशलक्ष टनांपेक्षा अधिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केली आहे.

‘मास हॅपिनेस’ ही आमची तत्वज्ञानाची संकल्पना असून त्याचा पाया कार्बन न्यूट्रॅलिटीवर आधारित आहे. याच तत्वज्ञानावर टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या पहिल्या BEV — ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला — ची तयारी करण्यात आली आहे. उत्पादनासोबतच आम्ही ग्राहकांना जागतिक दर्जाचा, सुरक्षित व तणावमुक्त मालकी अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत टँकर दुचाकीचा भीषण अपघात

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT