How To Detox Body saam tv
लाईफस्टाईल

Detox Body: तुमच्या शरीरात टॉक्सिन आहे? 'हे' बदल दिसल्यास समजून जा शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आलीये

How To Detox Body: चुकीच्या आहारामुळे आपल्या शरीरात टॉक्सिन पदार्थांची मात्र वाढते. या पदार्थांचं प्रमाण वाढलं की, शरीर आपल्याला संकेत देतं. हे संकेत नेमके काय असतात, ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे तरूण वयातच बऱ्याच समस्या मागे लागल्या आहेत. आपल्या दररोजच्या या चुकीच्या सवयींमुळे शरीरात घाण जमा होऊ लागते. याला आपण टॉक्सिक पदार्थ देखील म्हणतो. हे विषारी पदार्थ जे बाहेरील स्त्रोतांपासून तयार होतात.

ज्याप्रमाणे आपण बाहेर आल्यावर हात-पाय धुवून बॅक्टेरियांना दूर करतो, त्याचप्रमाणे तुमची बॉडी आतील बाजूने देखील स्वच्छ झाली पाहिजे. असं न केल्यास तुम्हाला सतत आरोग्याच्या काही ना काही समस्या जाणवू शकतात. एकंदरीत आपलं शरीर त्याची स्वच्छता ठेवण्याचं काम स्वतः करतं. मात्र अनेकदा टॉक्सिनचं प्रमाण जास्त असल्याने बॉडी साफ करण्याची शक्यता असते.

यावेळी तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देतं. ज्याद्वारे तुम्हाला समजलं पाहिजे की, आपल्या शरीरातील टॉक्सिन पदार्थ दूर करण्याची वेळ आली आहे. जाणून घेऊया हे संकेत नेमके काय आहेत.

सतत थकवा जाणवणं

अनेकदा आपल्याला सतत थकवा किंवा अस्वस्थ वाटू लागतं. यावेळी छोटी कामं करून देखील आपल्याला प्रचंड घाम येतो. जर तुम्हाला सतत असं वाटतं असेल तर हे शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याचे संकेत आहेत.

त्वचेच्या समस्या

त्वचेवर वारंवारु पुरळ येणं किंवा वेगळ्या पद्धतीचे चट्टे येत असतील तर सावध व्हा. जर तुम्हाला अशा पद्धतीचे संकेत दिसत असतील तर समजा तुमच्या शरीरातून लवकरात लवकर टॉक्सिन पदार्थ बाहेर पडले पाहिजेत.

पचनाच्या समस्या

शरीरात विषारी पदार्थांची मात्रा जास्त झाली ती तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याचा धोका असतो. यावेळी पोटात सूज येणं, बद्धकोष्ठतेचा त्रास होणं यांसारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे हे त्रास जास्त झाल्यास वेळीच उपाय करा.

झोपेच्या समस्या

प्रत्येक वेळी झोपेची समस्या ही तणावाशी संबंधीत नसते. अनेकदा झोपेच्या समस्या या तुमच्या शरीरात टॉक्सिन पदार्थ जास्त झाल्यामुळे देखील होऊ शकतात. त्यामुळे झोपेची समस्या नेमकी कशामुळे उद्भवतेय, हे जाणून घ्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT