Tourist Places in Kerala Saam Tv
लाईफस्टाईल

Tourist Places in Kerala: दक्षिण भारतातील ही पर्यटन स्थळं स्वर्गच, सुट्टीच्या दिवशी नक्की प्लान करा

Kerala Tourism : भारतातील दक्षिण टोकाला असलेले केरळ देवभूमी म्हणून ओळखले जाते.

कोमल दामुद्रे

Best Places to visit In Kerala :

अफाट निसर्गसौंदर्य, लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, हत्तीचे कळप आणि थंड हवेची ठिकाणे यासाठी दक्षिण भारतातील केरळ. भारतातील दक्षिण टोकाला असलेले केरळ देवभूमी म्हणून ओळखले जाते.

धकाधकीच्या जीवनात लोकांना रिलॅक्स होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात रमायचे असते. यासाठी फॅमिली किंवा फ्रेंडसोबत फिरण्याचा प्लान बनवतात. जर तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर दक्षिण भारतातील या स्थळांना नक्की भेट द्या.

1. मुन्नार

केरळमधील मुन्नार हे पर्यटनस्थळ सर्वात सुंदर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालते. चहाच्या बागा आणि हिरवेगार जंगल पर्यटकांना आकर्षित करते. येथे आपण ट्रेकिंग (Trekking) किंवा कॅम्पिंगला जाऊ शकतो.

2. अलेप्पी

केरळमधील प्रमुख पर्यटन (Travel) स्थळांपैकी एक अलेप्पी. येथे बॅकवॉटर ट्रिपचा मनमुराद आनंद लुटता येतो. तसेच हाऊस बोट देखील उपलब्ध आहेत. तुम्ही या ठिकाणी रात्र घालवू शकता.

3. कोची

अरबी समुद्राची राणी म्हणून कोचीला ओळखले जाते. हे केरळचे प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हटले जाते. पर्यटकांसाठी हे सगळ्यात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. शॉपिंग मार्केटसाठी देखील प्रसिद्ध आहे.

4. तिरुवनंतपुरम

त्रिवेंद्रम म्हणून ओळखले जाणारे तिरुवनंतपुरम. ही केरळचे (Kerala) राजधानी आहे. भारतातील प्रसिद्ध मदिरांपैकी तिरुअनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर आहे. या ठिकाणी तुम्हाला बोट रायडिंग, पॅराग्लायडिंग, सर्फिंग आणि हॉर्स रायडिंगसारख्या अॅडवेंचरचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

SCROLL FOR NEXT