Dharashiv Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Dharashiv Tourism : निसर्गाच्या कुशीत वसलेलं धाराशिव; अद्भुत नजारा पाहून भारावून जाल

Tourist Places in Dharashiv : धाराशिवमध्ये वन डे ट्रिपसाठी आम्ही काही खास ठिकाणे शोधून आणली आहेत. तुम्ही पर्यटन प्रेमी असाल तर या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.

Ruchika Jadhav

प्रत्येकालाच आपली सुट्टी बाहेर एन्जॅाय करायची असते. रोजच्या धावपळीतून सर्वांनाच ब्रेक हवा असतो. स्वत:चा माईंड फ्रेश करण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला जात असतात. सुट्टीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. या शोधासाठी पर्यटकांना वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोर करायची असतात. त्यामुळेच,आम्ही धाराशिवच्या पर्यटन स्थळांची माहिती घेवून आलो आहेत.

महाराष्ट्रातील धाराशिव लेणी उस्मानाबाद शहरापासून ८ किमी अंतरावर आहे. धाराशिव लेणी बालाघाट पर्वतावर वसलेली आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले उस्मानाबाद शहर त्याच्या सुंदरतेमुळे अनेक पर्यकाचं आकर्षण बनलं आहे. महाराष्ट्रातील धाराशिव लेण्यामध्ये पर्यटकांना प्राचीन किल्ले, मंदिरे,पाहायला मिळतील. ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेण्यासाठी उस्मानाबाद ठिकाण पर्यटकांसाठी फार उत्तम आहे. जर तुम्ही पण ऐतिहासिक स्थळांच्या शोधात असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी आहे. तुमचा उस्मानाबाद शहरातील धाराशिव प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

प्रेक्षणीय स्थळे

परंडा किल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला बहामनी राजवटीत महमूद गवान यांनी बांधला आहे. परंडा किल्ला लष्करी वास्तुकलासाठी प्रसिध्द आहे. या किल्यात आपल्याला प्राचीन महादेव मंदिर , नरसिह मंदिर आणि एक मशिद पाहायला मिळेल. या किल्यातील ५ फूट आणि ६ हातांची गणेशाची मूर्ती अनेक पर्यटकाचं आकर्षण ठरत आहे.

तुळजा भवानी मंदिर

महाराष्ट्रातील तुळजा भवानी मंदिर एक हिंदू मंदिर आहे. तुळजा भवानी मंदिरातील देवी भगवती [भवानी] म्हणून प्रसिध्द आहे. हे मंदिर बालघाटाच्या टेकड्यावर वसलेले आहे. तुळजा भवानी मंदिर श्री छत्रपती महाराज यांची आराध्यदेवता आहे. या मंदिराला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखतात. तुळजा भवानी मंदिरला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

धाराशिव लेण्या

मराठवाड्यातील उस्मानाबाद गावाजवळ धाराशिव लेणीचा प्राचीन लेणीसमूह आहे. पर्यटकानां धाराशिवपासून ५ किमी अंतरावर जावून अनेक लेण्या पाहायला मिळतील. पर्यटकानां धाराशिव लेण्यांमध्ये बौद्ध लेणी, जैन लेणी पाहायला मिळेल. धाराशिव लेण्या उस्मानाबाद शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर आहे. या लेण्यानां भेट देण्यासाठी पर्यटक हिवाळ्याच्या महिन्यात जाऊ शकता.

येडशी रामलिंग अभयारण्य

उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी रामलिंग अभयारण्याची स्थापना १९९७ रोजी झाली आहे. रामलिंग अभयारण्य अतिशय सुंदर वन पर्यटन आहे. हे पर्यटन स्थळ लाखो पर्यटकाचं आकर्षण ठरलं आहे. या अभयारण्यात पर्यटकांना लांडगा,मोर हरीण, माकडे इत्यादी प्राणी पाहायला मिळतील. येडशी रामलिंग अभयारण्याला पाहण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते जून आहे.

नळदुर्ग किल्ला

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. महाराष्ट्रातील नळदुर्ग किल्ला हा प्रसिध्द प्राचीन किल्ला आहे. या किल्यात मंदिराचां समावेश असून, पर्यटकानां गणपती महाल आणि लक्ष्मी महाल मंदिर पाहायला मिळतील. या किल्याचा इतिहास अनुभवण्यासाठी लाखो पर्यटकांचा मोठ्या संख्येने भेट द्यायला येत असतात. नळदुर्ग किल्ला अनेक पर्यटकाचं आदर्श ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT