Nagpur SAAM TV
लाईफस्टाईल

Orange सिटीमधील धार्मिक स्थळे पाहिलीत का? निसर्गाचा नजरा पाहून दिपतील डोळे

Religious Places Nagpur : महाराष्ट्रातील नागपूर शहर पर्यटनाचे आकर्षण आहे. छोट्या सुट्टीमध्ये नागपूरमधील 'या' प्रसिद्ध धार्मिक स्थळांना आवर्जून भेट द्या.

Shreya Maskar

महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. येथे पर्यटनाच्या दृष्टीने अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur ) शहराला धार्मिक (Religious Places) महत्त्व लाभले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नागपूरला भेट द्या आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घ्या.

धापेवाडा मंदिर

नागपूर जिल्ह्यात धापेवाडा गावात धापेवाडा मंदिर वसलेले आहे. हे मंदिर गावाच्या डोंगरावर आहे. धापेवाडा मंदिर हे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. धापेवाडा मंदिराला विदर्भाचे 'पंढरपूर' असेही म्हणतात.

टेकडी गणेश मंदिर

नागपूरच्या टेकडी गणपती हे इच्छापूर्ती देवस्थान आहे. येथे गणेश मंदिर आहे. हे मंदिर नागपूर शहरातील सीताबर्डी येथे वसलेले आहे. असे म्हटलं जातं की, मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून पिंपळाच्या झाडाखाली प्रकट झाली होती.

घोगरा महादेव

नागपूर मधील घोगरा महादेव मंदिर हे स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान आहे. हे शिवमंदिरे असून कैलास पर्वतासारखे दिसते. या मंदिराच्या येथून पेंच नदी वाहते. येथे सर्वत्र खडकाळ प्रदेश पाहायला मिळतो.

श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर

श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे नागपूर मधील कोराडी येथे आहे. असे म्हटलं जातं की, मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. येथे अनेक भाविक लोक येतात.

स्वामी नारायण मंदिर

नागपूरच्या वाठोडा रिंग रोडवर स्वामी नारायण मंदिर आहे. या मंदिराचे नक्षीकाम खूप सुरेख आहे. संध्याकाळी मंदिर दिव्यांनी उजळून निघते.

आदासा गणेश मंदिर

नागपूर शहरातील आदासा गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर छोट्या टेकडीवर वसलेले आहे. तुम्ही येथे छोटा ट्रेक करून जाऊ शकता. हे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात फोटोग्राफीसाठी बेस्ट लोकेशन आहे.

आग्याराम देवी मंदिर

नागपूर मधील गणेशपेठ परिसरात आग्याराम देवी मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे. नागपूरला आलेले पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT