Kargil Places To Visit Saam Tv
लाईफस्टाईल

Places to Visit in Kargil : कारगिलमध्ये बघण्यासारखं बरंच काही... डोळ्यांत साठवून ठेवाल अशा सौंदर्यस्थळांविषयी जाणून घ्या

Top 4 Places To Visit Kargil : कारगिलमध्ये अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. आम्ही तुम्हाला या ठिकांणाची माहिती देणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Top 4 Places To Visit Kargil :

भारताच्या इतिहासात २६ जुलै हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. २६ जुलै १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला. या युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार असलेलं कारगिलला निसर्गानेही भरभरुन दिलं आहे. पर्यटकांसाठी कारगिलमध्ये अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. आम्ही तुम्हाला या ठिकांणाची माहिती देणार आहोत.

कारगिल हे जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. कारगिल भारत-पाकिस्तान युद्धासाठी ओळखले जाते. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोर सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावत विजयाचा झेंडा फडकावला. त्याच दिवसाचे स्मरण करत दरवर्षी 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.

आज देश २४ वा 'कारगिल विजय दिवस' साजरा करत आहे. कारगिलची ओळख विशेषतः भारत-पाकिस्तान युद्ध ही असली तरी येथे अनेक सुंदर ठिकाणे येथे आहेत. जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा या ठिकाणांना नक्की भेट द्या.

१.कारगिल युद्ध स्मारक

कारगिलमध्ये १९९९ साली झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला. या युद्धात अनेक सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने 'द्रास युद्ध स्मारक' बांधले आहे. या युद्ध स्मारकाच्या गुलाबी खडकांवर 'ऑपरेशन विजय' मधील शहीद झालेल्या जवानांची नावे लिहिली आहेत. याला 'विजयपथ' असेही म्हणतात. गुलाबी सँडस्टोनची भिंत हे येथील मुख्य आकर्षण आहे.

तेथे 'मनोज पांडे गॅलरी' आहे ज्यात त्या काळात काढलेली छायाचित्रे, युद्धादरम्यान सापडलेली शस्त्रे आणि तोफखाना जपून ठेवण्यात आला आहे. युद्ध स्मारकात अमर जवान ज्योत सतत तेवत असते. येथे एक थिएटर देखील आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात कारगिल युद्धाची संपूर्ण कथा कथन करण्यात आली आहे.

२.द्रास व्हॅली

जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील द्रास हे सर्वात थंड ठिकाण आहे. याला लडाखचे प्रवेशद्वारही म्हणतात. द्रास हे समुद्रसपाटीपासून १०,८०० फूट उंचीवर वसलेले आहे. तेथे खूप थंडी असते. उन्हाळ्यातही लोक इथे उबदार कपड्यांशिवाय राहू शकत नाही.

हिवाळ्यात तेथील तापमान -20 अंशांपर्यंत जाते. सप्टेंबर ते ऑक्‍टोबर या कालावधीत येथील तापमान जवळपास 23 अंशांवर असते. ही वेळ व्हॅलीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे.

३. सुरु व्हॅली

सुरु व्हॅली हे एक सुंदर आणि अतिशय शांत ठिकाण आहे. या व्हॅलीला निसर्गाने वेढलेले आहे. त्यामुळे येथे खूप छान वातावरण असते. सुरु व्हॅली हे लडाखमधलं एक असं ठिकाण आहे. तिथे गेल्यावर स्वर्गात आल्यासारखे वाटते. या खोऱ्यात सुमारे २५ हजार लोक राहतात.

जे तिबेटी आणि बौद्ध समुदायाचे वंशज असल्याचे मानले जाते. बर्फाच्या पर्वतांनी वेढलेली ही सुरु व्हॅली पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येतात. येथील हवामानही खूप थंड आहे.

४.रंगदुम मठ

लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील झांस्करमध्ये रंगदुम बौद्ध मठाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. रंगदुम बौद्ध मठ हे पाहण्यासारखे सुंदर ठिकाण आहे. कारगिलपासून १२७ किमी अंतरावर असलेल्या झांस्करच्या सुरु खोऱ्यात शेकडो वर्षांपूर्वी बांधलेला हा मठ आहे. आज हे भिक्षूंचे निवासस्थान आहे.

हा मठ १८ व्या शतकात तिबेटी वास्तुकलेखानुसार बांधले गेले होते. बौद्ध धर्माशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, शिल्पे आणि हस्तलिखिते या मठात आहेत. या मठात शतकानुशतके राहणाऱ्या भिक्षूंचा लडाखमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारात मोठा वाटा आहे. हा मठ १४,४३६ फूट उंचीवर डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या किल्ल्यासारखा आहे. या मठातून तुम्हाला एका बाजूला उघड्या टेकड्या आणि दुसरीकडे बर्फाच्छादित पर्वत दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT