Valentine's Day 2025 ai
लाईफस्टाईल

Valentine's Day 2025: व्हॅलेंटाईन डे निमित्त पार्टनरसोबत पाहा हे टॉप 10 चित्रपट, नातं होईल रोमॅंटिक

Valentine's Day Special Movies: व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा आणि रोमँटिक नातेसंबंधांचा उत्सव मानला जातो. दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Saam Tv

फेब्रुवारी हा महिना प्रेमाचं प्रतिक मानला जातो. खरंतर, व्हॅलेंटाईन आठवडा या महिन्यात येतो. व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस खास असला तरी, लोक १४ फेब्रुवारीसाठी खास तयारी करतात. या दिवशी, जोडपे त्यांच्या जोडीदाराला खुश करण्यासाठी किंवा प्रेमाचे नाते जोडण्यासाठी, घट्ट करण्यासाठी हा दिवस एकत्र साजरा करतात. आज आम्ही तुम्हाला अशा Top 10 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पाहून तुमचा व्हॅलेंटाईन डे खास बनवू शकता.

जब वी मेट

14 फेब्रुवारीला तुम्ही 'जब वी मेट' हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. जर तुम्हालाही प्रेमात पराभव किंवा निराश वाटत असेल तर हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांनीही करीना आणि शाहिदच्या अभिनयाचे कौतुक केले.

सनम तेरी कसम

'सनम तेरी कसम' हा इतका चालला की, प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा रि रिलीज करणार आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल १६ करोडोंची कमाई केली. या चित्रपटातील इंदर आणि सरस्वती यांची लवस्टोरी दाखवण्यात आली आहे.

देवदास

शाहरुख खानचा देवदास चित्रपट आणि त्यातली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यात पारो आणि देवदासची लवस्टोरी आणि त्याचा शेवट तुम्हाला पाहायला मिळेल.

कुछ कुछ होता है

कुछ कुछ होता है हा चित्रपट हिन्दी भाषेत आहे. हा चित्रपट करण जोहर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता.

दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे

२५ वर्षे पुर्ण झालेला चित्रपट म्हणजे 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे'. हा चित्रपट तरूण प्रेक्षकांमध्ये अजून सुद्धा पाहिला जातो. यात सगळे ९० टीजचे बॉलिवूड सुपरस्टार्स अभिनय आहेत. त्याने प्रेक्षकांचे शेवट पर्यंत मन खिळून राहते.

हम आपके है कौन

सलमान खान आणि माधुरीचा सगळ्यात लोकप्रिय चित्रपट हा म्हणजे हम आपके है कौन. हा चित्रपट तुम्ही फक्त पार्टनर नाही तर फॅमिलीसोबतही पाहू शकता.

बर्फी

'बर्फी' हा चित्रपट तुम्ही कितीही वेळा पाहू शकाल असा आहे. त्यातली गाणी, त्यातले पात्र प्रत्येकालाच वेड लावतात.

कबीर सिंग

एक प्रियकर आणि प्रेयसी त्यांच्यातला वाद मग त्यांचे पुढचे आयुष्य कसे होते. हा चित्रपटातून तुम्हाला जोडीदाराबरोबर शेवट पर्यंत कसे राहायचे? हे शिकवू शकेल.

ये जवानी है दिवानी

एक प्रियकर आणि प्रेयसी आणि त्यांचे मित्र हा प्रवास तुम्हाला चित्रपटातून समजेल. या सिनेमाला आजही प्रेक्षक पसंती आहे. हा चित्रपट ३ जानेवारीला पुन्हा प्रदर्षित करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT