Toll Plaza News Saam Tv
लाईफस्टाईल

Toll Plaza News : टोल नाक्यांवर गाडी थांबवण्याची कटकट बंद होणार, नव्या सिस्टममुळे प्रवाशांचा वेळ वाचणार

Toll Plaza : देशातील रस्त्यांचे वाढते जाळे पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार नवनवीन प्रयत्न करत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Barrier Less Toll System:

देशातील रस्त्यांचे वाढते जाळे पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार नवनवीन प्रयत्न करत असतात. याच संदर्भात देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री (MoS) व्ही के सिंह यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सरकार लवकरच अडथळेरहित टोल सिस्टम सुरू करणार आहे. काय आहे संपूर्ण सिस्टम जाणून घेऊया.

टोल प्लाझावर लांबच लांब रांगा लागणार नाहीत

प्रवाशांना यापुढे टोल नाक्यांवर अर्धा मिनिटही थांबावे लागणार नाही कारण सरकार लवकरच अडथळारहित टोलिंग सिस्टम (System) सुरू करण्याचा विचार करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री (MoS) व्ही के सिंह यांनी बुधवारी सांगितले की, अडथळा-रहित टोलिंग सिस्टमची चाचणी सुरू आहे आणि आमची चाचणी यशस्वी होताच आम्ही ती लागू करू.

त्यांनी विनंती केली आहे की देशाने प्रवास (Travel) केलेल्या किलोमीटरवर आधारित पेमेंट सिस्टम देखील स्वीकारावी. व्ही के सिंह म्हणतात की टोलिंगची ही नवीन सिस्टम सुरू झाल्यामुळे परफॉर्मन्समध्ये सुधारणा होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.

सॅटेलाइट आणि कॅमेरावर सर्व आधारित असेल

व्ही के सिंह म्हणाले की FASTags च्या वापरामुळे टोल प्लाझावरील प्रतीक्षा कालावधी 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे, परंतु सरकारचे लक्ष्य 30 सेकंदांपेक्षा कमी करण्याचे आहे. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर पायलट आधीच सुरू आहे. येथे काही सॅटेलाइट आणि कॅमेरा आधारित प्रक्रिया तपासल्या जात आहेत.

ते म्हणाले की तुम्ही महामार्गावर प्रवेश करताच आणि तुमच्या वाहनाची (Vehicle) नंबर प्लेट कॅमेराद्वारे स्कॅन केली जाते आणि डेटा एकत्र केला जातो, तुमच्याकडून प्रवास केलेल्या किलोमीटरसाठी शुल्क आकारले जाईल. सध्या समजा तुम्ही रु. 265 भरले तर त्याचा किलोमीटर प्रवासाशी काहीही संबंध नाही.

हे टोल नियमावर आधारित आहे. दूरसंचार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रांशी जोडले गेले आहे, असे सांगून मंत्री म्हणाले की, सध्याच्या सरकारने दूरसंचार क्षेत्रासह सर्व क्षेत्रात केलेल्या कामाचा परिणाम म्हणून ही सर्व प्रगती होत आहे. ते म्हणाले की उत्तम दूरसंचार नेटवर्क टोल प्लाझाचा डेटा सुरक्षित ठेवण्यात मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT