Toes Revel Health, Feet Say About Your Health Saam Tv
लाईफस्टाईल

Toes Revel Health : भयंकर! पायांच्या बोटांमध्ये ही लक्षणे दिसताच व्हा सावध, असू शकतो गंभीर आजार; वेळीच घ्या काळजी

Feet Say About Your Health : पाय आणि बोटांमध्ये दिसणारी असामान्य गोष्ट देखील आरोग्याच्या संबंधित अनेक समस्यांचे कारण असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, पायाच्या बोटांशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत आपल्याला काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Do not Ignore These Signs Toes :

बरेचदा डोकेदुखी किंवा पाठ दुखू लागली की, अनेकदा उपचार करता येतो. परंतु, जेव्हा पायाचे दुखणे वाढते तेव्हा आपल्याला असे वाटते की आज आपण जास्त वेळ चालल्यामुळे असे झाले असावे.

पाय आणि बोटांमध्ये दिसणारी असामान्य गोष्ट देखील आरोग्याच्या (Health) संबंधित अनेक समस्यांचे कारण असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, पायाच्या बोटांशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत आपल्याला काळजी घ्यायला हवी. यामध्ये मधुमेह (Diabetes) आणि इतर अनेक गंभीर समस्यांचे कारण देखील असू शकते. यासाठी आपल्याला पायाची बोटे आणि नखांमध्ये दिसणारी चिन्हे जाणून घ्यायला हवी.

1. पायाची बोटे सतत थंड होणे

जर तुमच्या पायाची बोटे सतत थंड राहात असतील तर खराब रक्त परिसंचरण असू शकते. यामध्ये मधुमेह, हृदयाच्या समस्या, नसांमध्ये गाठी तयार होणे, थायरॉईड आणि संधिवातासारखे आजाराची (Disease) लक्षणे दिसून येतात.

2. नखांचा आकार बदलणे

एखाद्याच्या पायाच्या नखांचा आकार बदलत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. जर तुमच्या पायाची नखे वाकडी दिसत असतील तर अशक्तपणा, हायपोथायरॉईडीझम किंवा ऑटोइम्यून डिसऑर्डरचे लक्षण असू शकते.

3. बोट सुजणे

खराब रक्ताभिसरण किंवा लिम्फॅटिक सारखे आजर जडू शकतात. बिघडलेल्या रक्ताभिसरणामुळे पायाची बोटे सुजतात. यामध्ये बुरशीजन्य संसर्ग, दुखापत, सोरायसिस असू शकते. बोटांना सूज आल्यानंतर जास्त वेळ एकाच स्थितीत उभे राहाणे, योग्य प्रकारे फिटिंगचे बूट न घालणे, जास्त वजन असणे किंवा कमी पाणी यांचा समावेश असू शकतो.

4. बोटांना मुंग्या येणे

पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाच्या स्थितीमुळे बोटांमध्ये मुंग्या येऊ शकतात. हे अधिकदा मधुमेह असणाऱ्या लोकांना होऊ शकते. यामुळे पाय आणि हातांची संवेदना पूर्णपणे नष्ट होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT