प्रत्येक पालकांसाठी आपली मुले ही खास असतात. त्याचे भविष्य अधिक उज्जवल आणि चांगले व्हावे यासाठी ते प्रयत्न देखील करतात. कामाच्या गडबडीत अनेक पालकांना मुलांची व्यवस्थितरित्या काळजी घेता येत नाही.
पालक म्हणून तुम्हाला तुमच्या काही सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल, ज्यामुळे मुलांना वाईट सवयींपासून रोखता येईल आणि त्यांना अधिक स्ट्राँगही बनवता येईल. त्यासाठी काही सवयींमध्ये (Habits) बदल करणे गरजेचे आहे.
1. उत्तर देणे
जर मुलांना कोणी प्रश्न विचारला तर त्याची उत्तरे त्यांना देण्याची संधी द्या. लोकांचे प्रश्न त्यांना व्यवस्थित रित्या हाताळता येतील. तसेच योग्य आणि अयोग्य उत्तरांचा अर्थ त्यांना समजेल.
2. गरजेपेक्षा जास्त मदत
मुलांना गरज असेल तेव्हाच मदत करा पण गरजेपेक्षा जास्त मदत केल्यास मुलांना सवय लागते. त्यांच्या शरीराला आणि मनाला काम करण्याची संधी देत नाही. प्रत्येक कामासाठी ते पालकांवर अवलंबून राहातात. त्यांना त्यांच्या जीवनातील अडचणींना स्वत:हून सामोरे जाऊ द्या
3. भेटवस्तू
प्रत्येक गोष्टी मुलांना भेटवस्तू देणे टाळा यामुळे मुलांचे नुकसान होते. मुलांनी कोणतेही गोष्टी केल्यास पालक त्यांना भेटवस्तू देतात. त्यामुळे मुलांना त्याची सवय लागते. कोणतेही काम केल्यावर त्यांना पालकांकडून भेटवस्तूंची सवय लागते.
4. समस्यांना तोंड देणे
मुलांना अडचणी आल्यावर त्यांना स्वत:हून त्यातून बाहेर पडू द्या. समस्या सोडवताना त्यांना त्यांचा मेंदू वापरु द्या. त्यांना मानसिक ताण जाणवत असेल तर त्यांना आधार द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.