3rd Bada Mangal 2025 saam tv
लाईफस्टाईल

Bada Mangal 2025: आज तिसरा मोठा मंगळ; हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

3rd Bada Mangal 2025: ज्येष्ठ महिन्यातील सर्व मंगळवार हनुमानजींना खूप प्रिय असतात. जर एखाद्या व्यक्तीने या मंगळवारी हनुमानजींना प्रसन्न केलं तर त्याच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार महत्त्वाचा असतो. प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो. या या महिन्यांमध्ये ज्येष्ठ महिना हा सर्वात मोठा महिना मानला जातो, म्हणून त्याचे नाव ज्येष्ठ आहे.

ज्येष्ठ महिन्यात येणारा मंगळवार देखील खूप शुभ मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी हनुमानाची पूजा करणं महत्त्वाचं आणि पुण्याचं काम असतं. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी बुधवा मंगल म्हणतात.

अशी मान्यता आहे की, ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी हनुमानजी भगवान राम यांना भेटले होते. भक्त आणि देवाच्या या मिलनाच्या तिथीला उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा त्रेता युगाशी संबंधित असून उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, तिसरा बुधवा मंगळ २७ मे रोजी म्हणजे आज आहे. या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला हनुमानाचा आशीर्वाद मिळू शकतो.

आजच्या दिवशी कोणते उपाय ठरतील

हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तिसरा बुधवा मंगळच्या दिवशी गूळ दान करणं फायद्याचं असणार आहे. जर तुम्हाला हनुमानाचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या दिवशी मंदिरात किंवा गरिबांना अन्न दान केलं पाहिजे.

हनुमानजींचा आशीर्वाद हवा असल्यास आजच्या दिवशी चोळा दान करावा. कारण ते हनुमानजींना खूप प्रिय आहे आणि ते अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. यावेळी बजरंगीला लाल रंगाचा चोळा अर्पण करा.

बुधवा मंगळच्या दिवशी गदा दान करणं शुभ मानलं जातं. हे धैर्याचे प्रतीक आहे आणि हनुमानजींचे मुख्य शस्त्र आहे. अशा परिस्थितीत, ते अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्तता मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मिरजेत मुकबधीर शाळेत राज्यातील पहिली कर्णबधिरांसाठी रोबोटीक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

डॉक्टर सध्या झोपलेत, संध्याकाळी या, सरकारी दवाखान्यात नेमकं काय सुरू? VIDEO

Bypass surgery facts: हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियांबाबत काय असतात गैरसमज; डॉक्टरांनी सांगितली खरी गोष्ट

Rohit Pawar: अजितदादांचा मंत्र्यांवर कंट्रोल नाही का? रोहित पवारांचा संतप्त सवाल

Kalyan News: कल्याणमधील मराठी तरुणीच्या मारहाणीचा संपूर्ण VIDEO, आरोपी आधी आक्षेपार्ह बोलला, नंतर लाथ मारली

SCROLL FOR NEXT